निलंबन प्रस्ताव प्रलंबित असताना महागाव येथील नायब तहसीलदार महसूल यांची आर्णी येथे बदली!

महागाव/प्रतिनिधी:महागाव तहसील येथील महसूल नायब तहसीलदार डॉ.संतोष आदमूलवार यांची नुकतीच आर्णी तहसील येथे निवडणूक नायब तहसीलदार पदावर बदली झाली त्यांचा निलंबन प्रस्ताव प्रलंबित असताना बदली झाल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे महागाव तालुक्यातील फुलसावंगी, टेंभी येथील लाखो रुपयांच्या रेतीसाठा जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी रात्रीच्या धाडी टाकून जप्त केला या प्रकरणात कनिष्ठ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती परंतु वरिष्ठ अधिकारी कारवाई पासून दूर आहेत या प्रकरणात यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी एक ते चार प्रस्ताव विभागीय आयुक्त अमरावती कार्यालयाकडे पाठविला आहे परंतु त्या प्रस्तावावर अद्याप पर्यंत कारवाई होणे बाकी आहे मात्र आदमूलवार यांची बदली आर्णी येथील तहसील मध्ये करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी पाठवलेला प्रस्ताव नव्याने आलेले विभागीय आयुक्त यांच्या टेबलाकडे पोहोचला नसल्याचे बोलल्या जात आहे पूर्ण तालुक्याने उघड्या डोळ्याने पाहिलेला हा रेतीसाठा प्रकरणनी व रेती घाटावर १४४ कलम लागू असताना सुद्धा तालुक्यात खूप मोठ्या रेती तस्करी सुरू आहे परंतु या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई कधी होईल यावर पूर्ण तालुक्याचे लक्ष आहे.



