महागाव न.प.चे आरोग्य सभापती प्रमोद भरवाडे यांचा नगराध्यक्ष यांनी केला राजीनामा मंजूर तर नगराध्यक्ष करूना शिरबिरे यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला राजीनामा!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महागाव नगरपंचायत मध्ये नगर पंचायत मध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्या प्रमाणे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा राजीनामा देण्यात आला असून यामध्ये उपनगराध्यक्षांचा राजीनामा मंजुर करण्यात आला तर जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा देण्यासाठी गेलेल्या नगराध्यक्षांना जिल्हाधिकारी दौऱ्यावर गेल्याने राजीनामा न देता परतावे लागले होते.
महागाव नगर पंचायतच्या निवडणुकीत बहुमत मिळविलेल्या काँग्रेसला सत्ते पासुन दुर ठेवण्यासाठी भाजप व शिवसेना एकत्र येत सव्वा वर्षाच्या फॉर्मुल्याच्या आधारावर सत्ता स्थापन केली यामध्ये सुरुवातीच्या सव्वा वर्षांमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ.करूणा ना.शिरबिरे या तर उपनगराध्यक्ष पदी सुरेश पाटील नरवाडे विराजमान झाले आज मितीला नगर पंचायत मध्ये सत्ता स्थापन होऊन दीड वर्षाचा कार्यकाळ उलटून गेला आहे त्यामुळे आता आपला नगराध्यक्ष विराजमान होऊन सत्तेची सूत्रे आपल्या हातामध्ये आली पाहिजे या दृष्टीने भाजपने हालचाल सुरू केली आहेभाजप शिवसेना पक्षश्रेष्ठींमध्ये ठरल्याप्रमाणे आज उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या नंतर तो मंजूर करण्यात आला त्यानंतर नगराध्यक्ष सौ. करुणा शिरबिरे या आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा सादर करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे पोहोचल्या होत्या परंतु जिल्हाधिकारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असल्याने राजीनामा देऊ शकले नाही आज दि.३१ जुलै सोमवारला राजकीय घडामोडींना वेग आला असून आरोग्य सभापती प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रथम नगराध्यक्ष महागाव नगरपंचायत मध्ये जाऊन त्यांच्याकडे सुपूर्द केला व त्यांनी तो मंजूर केला थोड्याच वेळात महागावच्या नगराध्यक्षा सौ. करूनाताई नारायण शिरविरे या यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या कडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे अतिशय जलद गतीने होत असलेल्या या घडामोडी महागावासी यांचे लक्ष नगरपंचायत च्या बदलाकडे लागले आहे.



