ईतर

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जवळच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकली!

पुसद :सेंट मेरीज इंग्लिश स्कूल पुसद येथे श्रीरामपूर व माणिकडोह केंद्रांतर्गत पार पडलेल्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत माणिकडोह केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जवळाच्या विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक व सामूहिक क्रीडा प्रकारात विजेतेपद पटकावत केंद्रस्तरीय चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा जिंकली.

 यावेळी पार पडलेल्या बक्षीस समारंभात पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री धीरज आडे साहेब यांच्या हस्ते जि. प. उ. प्राथमिक शाळा जवळा येथील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारात विजेतेपट पटकावलेल्या विद्यार्थ्यांना व विजेत्या चमुंना प्रमाणपत्र, पदके आणि ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचा व चमूंचा गौरव करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी (शिक्षण) मा. उमेश वाघमारे मा. अमित बोजेवार, मा. शितलकुमार वानखेडे, गट समन्वयक बीआरसी पुसद, मा. मंजुश्री जोशी-बनसोडे मॅडम- केंद्र समन्वयक, माणिकडोह केंद्र, आदी मान्यवर बक्षीस समारंभात उपस्थित होते. दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारात क्रीडा प्रकारात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले.यावेळी प्रक्रम- क 200 मीटर धावणे शिवम वाघमारे, प्रक्रम-ब 200 मीटर धावणे साहिल ढोले, 100 मीटर व 200 मि.धावणे दिपाली भिसे, 100 मीटर धावणे शिवम ढुमणे, प्रक्रम क मुली लंगडी, मुली खो-खो, प्रक्रम क मुले खोखो, प्रक्रम ब मुली खो-खो, प्रक्रम ब मुले कबड्डी, प्रक्रम ब मुले 100×100मि. रिले विजेतेपद साहिल ढोले, शिवम ढुमणे, सोहम शेळके, वैभव बोलके आदी विद्यार्थ्यांनी व चमुंनी विजेतेपद पटकावले. यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री माधव गव्हाणे, पदवीधर स. शि. श्री परमेश्वर खंदारे, भाषा शिक्षक श्री उमेश बांगर. सहाय्यक शिक्षक श्री सुभाष थिटे, श्री कार्तिक ढोके उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close