” शोध आनंदी जिवनाचा “प्रख्यात मार्गदर्शक डॉ. श्री. शिवाजी कुचे यांचे महाराष्ट्र पोलीस दलाचे वर्धापन दिनानिमीत्त व्याख्यानातून पोलीसांना मोलाचे मार्गदर्शन!

पुसद : येथील अग्रवाल मंगल कार्यालयात आज दि,७ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचे वर्धापन (पोलीस रेझींग डे) दिनानिमीत्त यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडुन मिळालेल्या सुचनेनुसार पोलीसासाठी प्रख्यात मार्गदर्शक डॉ. शिवाजी कुचे सर (मोटीव्हेशनल स्पिकर) यांचेकडुन ‘शोध आनंदी जिवनाचा’ या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पोलीसांना त्यांचे धकाधकीच्या व व्यस्त डयूटीमधुन कशाप्रकारे सकारात्मक राहुन आपले आनंदी व तणावमुक्त जिवन जगावे यासाठी व्याख्याते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात पुसद पोलीस उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,वाहतुक नियंत्रण शाखा मधील कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच गृहरक्षक सैनिक, पोलीस पाटील यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन एकाग्रतेने व शांत चित्ताने व्याख्यान ऐकले. कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या सर्वांना प्रख्यात व्याख्याते डॉ. शिवाजी कुचे सर (मोटीव्हेशनल स्पिकर) यांनी सकारात्मक व नकारात्मक विचारांचा मानवी जिवनावर कशा प्रकारे अनुकुल व प्रतिकुल परिणाम होतो. याबाबत मार्गदर्शन करुन प्रतिकुल परिस्थितीमध्ये सुध्दा संयम ठेवून आनंदी जिवन जगण्याचा मार्ग दाखवीला तसेच काही नियम सांगीतले व त्याचसोबत त्यांनी केलेल्या हास्यविनोदामुळे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा हस्याचा बांध फुटला होता हे व्याख्यान निश्चीतच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या आनंददायी जिवनात जिवन जगण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
सदर व्याख्यानाचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागी पोलीस अधिकारी हर्षवर्धन बि.जे. पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स्टे. पुसद (शहरचे) ठाणेदार पो.नि. सेवानंद वानखेडे यांनी डॉ. शिवाजी कुचे सर (मोटीव्हेशनल स्पिकर) यांना आमंत्रीत करुन व पो. स्टे, वसंनगर चे ठाणेदार पो.नि.सतिष जाधव, पो. स्टे. पुसद ग्रामीण चे ठाणेदार स.पो.नि. सुरेंद्र राऊत, खंडाळा पो. स्टे. चे ठाणेदार स.पो.नि. विनीत घागे, वाहतुक नियंत्रण शाखेचे प्रभारी स.पो.नि. चौधरी यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले व स.पो.नि. प्रेमकुमार केदार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.



