अ.भा. आदिवासी विकास परिषदेची जिल्हा कार्यकारणी बरखास्त-जिल्हाध्यक्ष ऍड सुनील ढाले यांची घोषणा
पुनर्गठन बैठक २५ डिसेंबर रोजी होणार

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेची जिल्हा कार्यकारणी वरिष्ठांच्या परवानगीने बरखास्त केल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्याची नवीन कार्यकारणी 25 डिसेंबर 2023 रोजी यवतमाळ येथे घेण्याचे योजिले आहे. सदर पुनर्गठन सभेला राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव मोघे , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम साहेब चव्हाण , राष्ट्रीय समन्वयक जितेंद्र मोघे , विदर्भ अध्यक्ष दिसतो चंद्रशेखर मडावी , विभागीय अध्यक्ष माधवराव वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल. आदिवासी विकास परिषद मध्ये सक्रिय काम करणाऱ्या तसेच आजीवन सदस्य नोंदणी केलेल्या सदस्यांना संघटनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल . अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ही संघटना राष्ट्रीय स्तरावर काम करणारी प्रमुख संघटना कॉल. या संघटनेने आदिवासी समाजातून राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर शेकडो नेतृत्व निर्माण केले तसेच संघटनेच्या माध्यमातून लाखो आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला. तेव्हा या संघटनेमध्ये सामाजिक जाणीव असून समाजासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या आदिवासी समाजातील कर्तबगार युवकांना जाहीर आवाहन करण्यात येते की , या बैठकीला आपण उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे कृष्णा पूसनाके यांनी केले आहे.



