तायक्वांदो स्पर्धेत प्रियदर्शनी कॉन्व्हेंट आमणीचे घवघवीत यश!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम) :- पुसद येथे दि.२२ ऑक्टोबरला अंतर वर्गीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला या स्पर्धेत प्रिदर्शनी कॉन्व्हेंट आमनी महागाव मधून एकूण ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या मध्ये ११ पैकी ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, या मध्ये भाविका कदम हिने (सुवर्ण पदक व उत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार प्राप्त केला )
सुवर्णपदक विजेते अथर्व वजीराबादे, श्रेयश कावडे,सोहम यादव,रौप्य पदक विजेते कृपाल पुंजलवार, स्वरीत कावडे, ओजस्वी चौधरी, प्राची चव्हाणकांस्य पदक विजेतेसंस्कृती काळे, श्रेया राठोड,या वेळी संस्थेच्या सचिव श्रीमती वनमाला ताई राठोड, शाळेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याध्यापक अभिषक राठोड सर उप मुख्याध्यापक हर्षवर्धन राठोड सर, तायक्वांदो प्रशिक्षक मारुती बाभळे सर व सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.