ईतर

आदिवासी महिलेचे निलंबन तात्काळ मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू;बस आगार प्रमुख पुसद यांना आदिवासी संघटनेचा इशारा!

पुसद: येथील एसटी महामंडळाच्या आगरात श्रीमती सविता बाळकृष्ण ससाणे या आदिवासी समाजाच्या महिला वाहक पदावर कर्यरत असून त्यांना दि.२७नोंहबर २०२३रोजी पुसद येथील शाखा व्यवस्थापक यांनी शुल्लक कारणावरून निलंबित करण्यात आले आहे.

आगार प्रमुखाकडुन या महिला कर्मचाऱ्यांना काही चूक नसताना त्यांना जाणीवपूर्वक अशी वागणूक दिली गेली याचा जाब विचारण्यासाठी पुसद येथील आदिवासी संघटनांनी त्यांना निवेदन देऊन तात्काळ निलंबन मागे घेण्यास सांगितलं आहे जर आठ दिवसाच्या आत हे निलंबन मागे नाही घेतले ते आदिवासी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावर शाखा व्यवस्थापक यांनी सोमवार दि.३ डिसेंबर रोजी त्यांना कामावर घेऊ असे आश्वासन दिले आहे. आदिवासी विकास पारिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड.सुनिल ढाले ,देविदास डाखोरे भारतीय आदिवासी पँथर संघटना जिल्हा अध्यक्ष, आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी काका , गजानन टारफे आदिवासी युवा विकास परिषद पुसद तालुकाध्यक्ष,रामराव व्यवहारे,दिलीप चिरमाडे, दत्ता बोलके, राजु गायकवाड आदिवासी युवा विकास परिषद उमरखेड तालुकाध्यक्ष सह आदिवासी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close