क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंतीच्या भव्य दिव्य रॅलीने वेधले पुसदकरांचे लक्ष;ढेमसा आणि दंडार नृत्याने घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

पुसद : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणुकी मधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीचे उद्घाटन आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी, आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक, महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष आशिष देशमुख यांच्या हस्ते पिवळी झेंडी दाखवून रॅलींची सुरुवात करण्यात आली. 
यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिवअनिरुद्ध पाटील चोंढीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ( शिंदे गट)ॲड.उमाकांत पापिनवार, टायगर सेनेचे जिल्हाध्यक्षष किशोर दादा कांबळे,आदिवासी सेवक नारायण कऱ्हाळे, माधवराव वैद्य, गणपतराव गव्हाळे, आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण भुरके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे, परसराम डवरे, जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले, डॉ .हरिभाऊ फुपाटे, साकिब शाह, अमेय नाईक, कुणाल बनसोडे, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी सर्व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रॅलीचे सुरुवातीला प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आरतीताई फुपाटे, आमदार इंद्रनील नाईक व आमदार निलय नाईक यांनी बिरसा मुंडा यांच्याप्रति आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे यांनी मानले.
बिरसा मुंडा ना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष युवक युतीने सहभाग नोंदविला होता. पिवळी झेंडे दाखवल्यानंतर रॅली महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुभाष चौक मार्गे मार्गस्थ होत असताना जय भीम आणि जय बिरसा च्या नाऱ्यां जयघोष गुंजत होता. पारंपारिक ढेमसा व दंडार नृत्यांचा आस्वाद घेण्यासोबतच त्यांचा सारखा डान्स करण्याचा मोह अनेकांना आवरला नसल्याने अनेकांनी ढेमसा नृत्यावर डान्स केला. यावेळी महिला व युवतीने सुद्धा मोठ्या उत्साहाने आपला आनंद बिरसा मुंडा चा जयजयकार व गाण्याच्यातालावर नाचून आनंद व्यक्त केला.
सदर रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीचे प्रमुख पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, विष्णू शिकारे, विठ्ठल मिरासे, गजानन भोगे, पंकज वंजारे, सखाराम इंगळे, वसंता चिरमाडे, सुनिता मळगणे, मनीषा बेले व उत्सव समितीच्या अनेक पदाधिकारी सदस्यांच्या अथक प्रयत्नातून रॅली यशस्वीरित्या व शांततेत भव्य दिव्य स्वरूपाने पार पडली. क्रांतिवीर मित्र मंडळ चौकातून निघालेली रॅली चा समारोप हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक चौकामध्ये करण्यात आला यावेळी रॅली मधील सहभागींचे आभार माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे यांनी मांनले.



