ईतर

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची अनंतनगर येथे भेट तर अंबोडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी!

महागा डेव/प्रतिनिधी ( संदीप कदम) महागाव तालुक्यामध्ये २१ व २२ जुलै ला ढगफुटी झाल्याने अतिवृष्टी निर्माण होऊन सर्वत्र शेतकऱ्यांच्या शेतामधील बांधा विहिरी शेतातील माती वाहून गेल्याने व दुकान गोडाऊन दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अंबोडा गावामधील नाल्याकडच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अतोनात प्रचंड असे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी नव्यानेच जिल्हाधिकारी पदाचे सूत्र हाती घेतलेले पंकज आशिया यांना या भागाची पाहणी

करण्यासाठी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी भ्रमणध्वनी वरून विनंती केली त्या विनंतीस मान देऊन महागाव तालुक्यातील अंबोडा या गावी दि.२६ जुलैला थेट शेतकऱ्यांच्या बांधावर व पूरग्रस्त मजूरदारांच्या घरी पाहणी करून तालुक्यातील नुकसानग्रस्त एकही व्यक्ती वंचित राहणार नाही जन आंदोलन आधार संघर्ष समितीने पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त लोकांचे अर्ज भरून घेतले होतेत्या सर्व लोकांना अनुदान मिळेल त्यापैकी एकही वंचित राहणार नाही असे आदेश

उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार मुपडे मॅडम, यांना जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्वांसमोर दिले त्यामुळे दुःख विसरून त्या ठिकाणी गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले यावेळी उपस्थित जगदीश भाऊ नरवाडे, सरपंच बंडू मुनेश्र्वर, बंडू वाघमारे, विनोद खंदारे, सचिन राऊत, गजानन तायडे, जगदीश सरकाटे, तलाठी सविताबोबले मॅडम, गणेश दादाराव ठाकरे,भगवान गरडे, अमोल राऊत , यांच्यासह खूप मोठ्या प्रमाणात गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते -आनंदनगर येथे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट आनंदनगर येथील पूरग्रस्त भागाचे पाहनी जिल्हाधिकारी आशिया यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला व उपायोजनाबाबत यंत्रणेला त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close