सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी शास्त्रज्ञ यांच्या समोर मांडली व्यथा!

पुसद :तालुक्यातील बोरी खुर्द येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी करत असता तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये यॅलो मोझॅक, खोड अळी, चक्रीभुंगा, बुरशी मुळकुज व वातावरणातील व्हायरस या विविध रोगामुळे तालुक्यातील८०टक्के संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे.
लागवडीसाठी लावलेला खर्चही निघणार नाही ही संपूर्ण परीस्थिती निर्माण झाली असताना यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे व कृषी शास्त्रज्ञ तसेच पुसद तालुका कृषी अधिकारी व्ही. टी. मुकाडे, कृषी सहाय्यक एस.पी.जाधव मॅडम ,कृषिनिर्मिती फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष विश्वनाथ मुखरे व बोरी शिवारातील विविध शेतकरी पाहणी करण्यासाठी हजर होते. उपस्थित असलेले शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिक्षक लहाळे यांनी सोयाबीन पिकाला विविध रोगापासून झालेल्या नुकसानीची दाहकता दाखवत होते. 
सोयाबीन उत्पादक शेतकरी एकरी १० ते १२ हजार खर्च करून बसले आहेत,उत्पादन खर्च ही निघने अवघड आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतशिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे तात्काळ पंचनामे करून कृषी अधिक्षकांनी शासन दरबारी या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडाव्यात व जास्तीत जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी तसेच पिक विमा मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी बोरी शेतशिवारातील विश्वनाथ मुखरे, विनोद पुलाते, मयुर शिवणकर, अश्विन पुलाते, गजानन मुखरे, आदी विविध शेतकरी उपस्थित होते.



