Uncategorizedसामाजिक

‘ग्रीन डे’निमित्त जि.प.शाळा कवडीपुर तांडा येथे वृक्षारोपण ! ‘वृृक्ष जगले तरच सृृष्टी जगेल’- प्रसाद केशट्टीवार

'ग्रीन डे'ला सत्यसाई सेवा समितीचा पुढाकार!

पुसद : पर्यावरणाच्या र्‍हासामुळे मनुष्य तसेच प्राणीमात्रांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून पर्यावर्णातील महत्वाचा घटक असलेली “वृक्ष जगले तरच सृष्टी जगणार” असल्याने वृक्षारोपन व संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी व श्री सत्यसाई सेवा समितीचे प्रसाद केशट्टीवार यांनी केले.ते कवडीपूर तांडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी(ता.५)आयोजित ‘ग्रीन डे’ निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय पवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक बळीराम राठोड, संतोष मस्के, प्रवीण राठोड, सत्यसाई सेवा समितीचे बालाजी बंडेवार, डॉ. संदीप चव्हाण, अरुण धुमाळ, प्रसाद केशेट्टीवार, गजानन आरगुलवार,अजय विश्वकर्मा, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र तालंगकर, शिक्षिका संध्या बेद्रे,रंजना कोडगीरवार, करुणा काळे, सिमा येरावार आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत पारंपारिक पद्धतीने न करता स्वामी विवेकानंदाच्या जीवन चरित्र्यावर आधारीत पुस्तके देऊन केले.पुढे बोलतांना, श्री.केशट्टीवार यांनी सत्यसाई समिती मांडवा येथे गेल्या दोन वर्षांपासून राबवित असलेल्या उपक्रमाची तसेच तालुक्यातील हुडी,निंबी,कवडीपूर आदी गावात जवळपास दोन हजार पाचशे वृक्षांचे रोपटे दिल्याचे तसेच वृक्षारोपनासह संगोपनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ.चव्हाण यांनी शालेय विद्यार्थ्यांना ‘आपले आरोग्य, आपल्या हाती’ या विषयावर मार्गदर्शन केले.यानंतर मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी श्रमदान करुन शाळा व श्री सत्यसाई समितीने पुरविलेले वड,उंबर,पिंपळ, कडूनिंब,आवळा,जांभूळ,बेल,चेरी तसेच गुलाब, मोगरा,जास्वंद,स्वस्तिक यांचेसह एकूण पंचावन्न रोपटे शाळेच्या परिसरात लावली.रोपट्यांचा निम्मा खर्च सत्यसाई सेवा समितीने व निम्मा खर्च शाळेने उचलला.
विज्ञान विषय शिक्षिका सीमा येरावार यांनी वृक्षारोपण व संगोपनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना ग्रीन डे शपथ दिली व सर्वांनी वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प केला.श्री.सत्यसाई सेवा समितीचे सदस्य गजानन आरगुलवार यांनी वृक्षांचे जीवनातील महत्व सांगून वृसंवर्धन होत आहे की नाही यासाठी शाळेला वेळोवेळी भेट देणार असल्याचे सांगितले.व रोपट्यांच्या उपलब्धतेनुसार शाळेला पुन्हा रोपे देण्याचे आश्वासित केले.यावेळी मान्यवरांनी शाळेचा परिसर,स्वच्छता व शिस्त पाहून समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत जामगडे यांनी केले.संचालन माधव कानगुले यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी मंडळाने पुढाकार घेतला.श्री सत्यसाई सेवा समिती,पुसद व जि.प.शाळेने राबविलेल्या उपक्रमाचे गावकर्‍यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close