ईतर

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा अखेर २४ तासानंतर मृतदेह वडसदच्या ओढ्यात सापडला!

पुसद:तालुक्यातील धनसळ येथे दि.२६सप्टेंबर २०२३रोजी पडलेल्या पावसामुळे नाले ओढे ओसंडून वाहत होते.अशातच गावालगत च्या ओढ्याच्या पुलावरून जात असलेल्या व्यक्ती सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास वाहून गेला होता.यांची माहिती गावातील नागरिकांनी प्रशासनाला दिली त्यावेळी प्रशासनाने तात्काळ एनडीआरएफचे पथक यवतमाळ वरुन बोलावून काही नांगरिकांनी व या पथकाने वाहुन गेलेल्या त्या व्यक्तीचा शोध सुरू केला मात्र. रात्रीची वेळ असल्यामुळे शोध कार्यास अडचण निर्माण झाली होती पुन्हा दुसऱ्या दिवशी शोध कार्यास सुरुवात केली असता अखेर त्या व्यक्तीचा मृतदेह वडसद येथील ओढ्यात सापडल्याने एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बाळू भीमराव पानपट्टे वय ५५ वर्षे रा.धनसळ असे मृतदेह सापडलेल्या इसमाचे नाव आहे. तो दि.२६सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान ओसंडून वाहत असलेल्या पुलावरून मार्गक्रम करीत होता.अशावेळी त्यांना उपस्थितांनी अडविण्याचा प्रयत्न केला होता.परंतु बाळु ने कोणाचेही ऐकले नाही.शेवटी गावातच राहणाऱ्या एका युवकाने त्याला धरून घेऊन जात होता. अशावेळी त्याच्या हातातून बाळू निसटल्याने संतुलन बिघडले. अशातच तो वाहून गेला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी तहसील प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु त्याचा शोध लागला नाही. शेवटी तहसील प्रशासनाने यवतमाळच्या एनडीआरएफ पथकाला पाचरन केले.अखेर २४ तासाच्या शोधकार्या नंतर त्या इसमाचा मृतदेह आढळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close