काळी दौ येथे घरावर वीजेचे तार पडुन घराला आग;घरातील कोंबड्यांसह सहित्य जळुन खाक,

काळी (दौ.)महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे ३३ केव्ही लाईनीचे वीज तार घरावर पडून घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. बंडु कोंडबा सावंत असे नुकसानग्रस्त घरमालकाचे नाव आहे.
या बाबत प्राप्त महिती अशी की आज रविवारी दुपारच्या सुमारास काळी दौ येथे वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान गावातील टिपु सुलतान चौक परीसरातील रहिवासी बंडु कोंडबा सावंत यांच्या घरावरुन जात असलेल्या ३३ केव्ही चे वीजतार हे त्यांचे घरावरील टिनपत्रावर पडले, आणी काहीच वेळात घरातील सहित्याला आग लागली, या वेळी घरात कोणीही नसल्याने जिवीत हाणी टळली, मात्र या आगीत घरातील दहा कोंबड्यां सह, गहु, बाज व आदी जीवनावश्यक वस्तु जळुन खाक झाले,
तसेच घरावरील टिनपत्रे व भिंतीचे मोठे नुकसान झाले. या घटनेत बंडु सावंत यांचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असुन त्यांचा परीवार उघडयावर आला आहे, त्यामुळे महसुल प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत बंडु सावंत यांनी केली आहे.



