जागतिक एड्स दिना निमित्य सु.ना.फार्मसी कॉलेजच्या वतीने जागरूकता रॅली

पुसद :ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) मुळे होणाऱ्या ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (AIDS) बद्दल जागरुकता पसरवण्यासाठी आणि रोगाने ग्रस्त असलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन पाळला जातो. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने 1 डिसेंबर २०२४ रोजी सुधाकरराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुसदच्या वतीने सर्व डी.फार्म, बी.फार्म व एम. फार्म अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक एड्स दिनांक निमित्त सकाळी 9.30 वाजता महाविद्यालय प्रागण ते उपजिल्हा रूण्यालय, पुसद आयोजीत करण्यात आली. या प्रभात फेरी आयोजन मध्ये सुधाकरराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज पुसदचे प्राचार्य
डॉ. पी. एस. कवटीकवार प्राचार्य सुधाकरराव नाईक फार्मसी महाविद्यालय पुसद, डॉ. ए. एस. प्रतापवार, डॉ. अरुण महाले कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. विनोद मासिरकर कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. विलास देशमुख, डॉ. रवी किरण वाकडे, श्री नरेंद्र फुपाटे. प्रा. पारस पोफाळकर, दीपक गाढवे , प्रा जाधव, शुभम श्रीगारे प्रा. रामपाल जाधव, प्रा. कु. भक्ती बंग, प्रा. कु. व्यवहारे, प्रा श्री बोथरा, इतर कर्मचारी शिक्षकेत्तर कर्मचारी श्री झेड एम राठोड श्री कैलास तुते, श्री. विनोद चव्हाण, श्री जे.के. बेग, श्री. एम. सी. सय्यद, श्री. एस. बी. सय्यद उपस्थित होते. तसेच सर्व बी. फार्म, एम फॉर्म चे विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.



