किशोर भवरे यांनी केली ईजनी येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी:तर आनंदनगर येथील त्या पूरग्रस्तांना केले ब्लॅंकेटचे वाटप !

महागाव/प्रतिनिधी:-सतत दोन दिवस पडलेल्या धुवाधार पावसाने व अतिवृष्टीने तालुक्यातील अनेक नदीकाठच्या नाल्याकडच्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणे नुकसान झाले असून हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे याच अनुषंगाने ईजनी येथे आज सामाजिक कार्यकर्ते किशोर दादा भवरे यांनी तेथील नुकसानग्रस्त शेतकरी गजानन टेटर व अन्य शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली तसेच भिंत पडलेल्या बबन रणमले यांच्या घराची पाहणी केली जास्तीत जास्त मदत शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे सुद्धा सांगितले.
व अनंतनगर येथील बेटावर अडकलेल्या त्या ४० व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप केले सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले दलित मित्र आरोग्य दूत नेहमी समाजाप्रती काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात यावेळी त्यांच्यासोबत शिवाजीराव सवनेकर, शैलेश भाऊ कोपरकर, साहेबराव पाटील कदम ,महेंद्रभाऊ कावळे, पवन पाटील, दत्तराव पवार, गोविंदराव पवार,देविदास राठोड, किरण राठोड, जगदीश राठोड,केदार पानपटे बिपिन पवार, नितीन भारती,यांच्यासह ईजनी व आनंदनगर, येथील गावकरी उपस्थित होते.
शिवाजीराव देशमुख सवनेकर यांची सामाजिक बांधिलकी: आनंदनगर येथील व हिवरा संगम येथे वर्ग दहावी मध्ये शिकणारी कु. सोनाली बाबुराव राठोड हिचे संपूर्ण दहावीचे पुस्तक लेटर हे नाल्याच्या पाण्यामध्ये वाहत गेल्याची माहित होतात सवणेकर यांनी पुढाकार घेऊन कु. सोनाली राठोड हिला दहावीचा पूर्ण पुस्तक संच व लेटर संच देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.



