ईतर

ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात टॉल्या पलटी होऊन एक महिला दगावली तर ९जण गंभीर जखमी!

पुसद : सध्या अनेक साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपुष्ठात आल्याने अनेक साखर कारखान्यांचे ऊस तोड कामगार परतीच्या मार्गावर आहेत. दरम्यान लातुर जिल्ह्यातून ऊसतोड कामगार गावाकडे परत जात असताना एक दुर्देवी घटना घडली आहे उमरखेड तालुक्यातील आडद येथील ऊसतोड कामगारांनी भरलेल्या दोन ट्रॉल्या पलटी होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात एक महिला दगावली ९ मजूर गंभीर जखमी असून या अपघातग्रस्तांना पुसद येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे पुन्हा ऊसतोड कामगारांचा अशा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करत आहे.

याबाबत ‘झेप न्यूज’ ला सूत्राने दिलेली माहिती अशी की,पुसद तालुक्यांसह आजूबाजूच्याही तालुक्यात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने या भागातील मजुरांच्या हाताला कामे नाहीत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी, मजुरदार यांच्यावर उपासमारीची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे गोरगरीब, अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी कुटुंबे कामाच्या शोधात मोठ्या शहरात तर कांहीं कुटुंबाचा काफिला सहकुटुंब ऊस तोडणी कामासाठी परजिल्ह्यात व लगतच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात स्थलांतर होताना तांड्यात आदिवासी वाड्याचे चित्र पाहावयास मिळते मात्र यातील काही ऊसतोड मजूर यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतताना आज दि, २८ मार्च २०२६ रोजी पुन्हा मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे.हे ऊस तोडणी मजूर आपल्या राहते घरी येत असताना, घरापासून अगदी २ किलोमीटर अंतरावर या मजुरांनी भरून असलेल्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉली पलटी झाल्याने, या भीषण अपघातामध्ये एक महिला ठार झाली असून, एकूण ९ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळालेली आहे.ही घटना उमरखेड उंमरखेड तालुक्यातील धनज आडद तसेच पुसद तालुक्यातील वेणी, धनसळ, मरसूळ येथील मजूर ऊसतोडीसाठी लातूर जिल्ह्यातील कारखान्यावर गेले होते गळीत हंगाम संपुष्टात आल्याने हे कामगार सहकुटुंब गावाकडे परत येत असताना दि.२७ मार्च रोजीच्या रात्री या मजुरांनी वारंगा फाटा जवळ असलेल्या बस स्टँड येथे मुक्काम केला होता. त्यानंतर पुन्हा सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास हे मजूर गावाच्या दिशेने निघाले. सकाळी अंदाजे १०:३० ते ११:०० वाजण्याच्या सुमारास या मजुरांने भरून असलेले २ ट्रॅक्टर ट्रॉल्या धनज पासून २ किलोमीटर अलीकडे अंतरावर असताना रस्त्याच्या उतारावर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, या मजुरांनी भरून असलेल्या ट्रॅक्टटरच्या ट्रॉल्या पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला परंतु या ट्रॅक्टर ट्रॉल्यामध्ये नेमके किती मजूर होते, याची माहिती मिळू शकली नाही. पण त्यापैकी, अभिषेक शंकर धुर्वे वय ५ वर्ष, मथुराबाई हळसे, सुनिता माधव गुहाडे, रामराव मारोती व्यवहारे, बालाबाई दौलत भडंगे, सुशीला दत्ता हाळसे, रेखा संतोष धुर्वे, अनिता संतोष ढंगारे, अर्चना राम व्यवहारे, विलास संतोष ढंगारे या दहा व्यक्तींना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी सकाळी ११:३० ते ११४५ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले. त्यावेळी उपस्थित डॉक्टरांनी गंभीर जखमींची तपासणी केली असता, जखमींपैकी अर्चना राम व्यवहारे या महिलेस मृत घोषित केले.तर एकूण ९ मजुरांपैकी दोन व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना रेफर करण्यात आलेले आहे. व उर्वरित जखमी व्यक्तींवर उपचार सुरू असल्याची सूत्राची माहिती आहे. परंतु अशीच एक घटना एक महिना पहिले घडली होती. ऊस तोडीवरून गावाकडे परत येणाऱ्या गोपवाडी येथील मजुरांचा अपघात होऊन, तीन मजूर व एक चिमुकली यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. आणि पुन्हा अशी दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. जर वेळीच पुसद मतदार संघात, मोठे विकास कामाचे प्रकल्प आणले असते, तर कदाचित या घटना घडल्या नसत्या,अशी तीव्र प्रतिक्रिया सध्या संपूर्ण पुसद तालुक्यातील उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close