राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुसद विभाग आढावा बैठक संपन्न!

पुसद : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुसद, उमरखेड, महागांव,तीन तालुक्याची पुसद विभागाची आढावा बैठक पक्षकार्यालय,पुसद येथे दि.२७ मार्च रोजी संपन्न झाली या बैठकीला अफजल फारुकी यवतमाळ जिल्हा निरीक्षक तथा प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल महाराष्ट्र व वर्षाताई निकम अध्यक्ष पुसद विभाग यवतमाळ जिल्हा,शरद मैंद प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राजुभैय्या जैस्वाल,उमरखेड विधानसभा प्रभारी, प्रदीप देवसरकर हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या स्वागताने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे शरद मैंद यांनी केले अत्यंत विपरीत परिस्थितीत मागील नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आले सबंध जिल्ह्यातून तीन नगरसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे आहेत हे या ठिकाणी उल्लेखनीय असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संबंधाने आम्ही पक्ष बांधणी करत असून निवडणुकाना सामोरे जाणार आहोत असे त्यांनी सांगितले यावेळी अकील मेमन गटनेते महाविकास आघाडी,नगरपरिषद पुसद यांनी तसेच प्रदीप देवसरकर व राजू भैय्या जैस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले.वर्षाताई निकम यांनी पुसद येथील पक्ष संघटना व्यवस्थित असून आगामी निवडणुकीच्या संबंधाने मित्रपक्षासोबत संवाद ठेवून निवडणुका लढाव्यात असे कार्यकर्त्यांना संबोधिले याप्रसंगी अफजल फारुकी यांनी पुसद येथील पक्ष संघटन शरद मैंद यांच्या नेतृत्वाखाली संघटित असून पुढील निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे मित्र पक्षासोबत सुसंवाद कायम ठेवून वाटघाटी कराव्या असे आवाहन केले संचालन नारायण क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन नाना बेले यांनी मानले .यावेळी या बैठकीला ऍड भारत जाधव, अशंका कांबळे,परमेश्वर जैस्वाल, के जि. चव्हाण,गणेश दिंडे,नाना बेले,चक्रधर मुळे,ऍड गोपाल मस्के, स्वप्नील जैस्वाल,बळवंत मनवर,दीपक तायवाडे, उत्तम चापके,सय्यद नायब, नारायण जाधव,कैलास जळगावकर, भारत चव्हाण, यु एन वानखेडे, पांडुरंग चोपडे,अरुण ठाकरे,श्रीकांत वानखेडे, विश्वास ठाकरे, जय दळवी, प्रवीण कदम, मोहन गोदे, शेषराव राठोड,गजानन ठाकरे, दत्ता शिंदे, गौरव सुकळकर, संजय जाधव, सुमित बोडखे,पवन चव्हाण, ऍड जुनेद शेख, धीरज कांबळे, गुलाब मनवर, संदेश रणवीर, सागर पारवाणी, दिनेश बलखंडे,विशाल दुधाने, यश काळे,शेख आवेश,सचिन सांगडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



