पुसद नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांच्या नशिबीही मरणयातना ! हिंदू स्मशान भूमीतील अतिक्रमण हटवून तात्काळ सुशोभीकरण करा- दीपक सिंह परिहार जिल्हा सरचिटणीस भाजपा!

पुसद :नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला लागुन असलेल्या पेट्रोल पंपाला जवळील हिंदू स्मशानभूमीचे पावित्र्य धोक्यात आले असून स्मशान भूमीत कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. हा कचरा आता भटकी कुत्री व मोकाट जनावरे स्मशानभूमीत पसरवत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. तरीही या स्मशानभूमी परिसरातच कचरा टाकला जात असल्यामुळे या स्मशानभूमीला डंपिंग ग्राऊंडचे स्वरुप आले असून या स्मशानभूमीला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. याची तक्रार पुसद नगरपरिषद प्रशासनाकडे दिपक सिंह परीहार जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पक्ष पुसद जिल्हा यांनी केली असून या स्मशानभूमीतील अतिक्रमण हाटवुन तसेच संरक्षण भिंतेचे बांधकाम करून ग्रील गेट बसवुन साफसफाई करून सुशोभीकरण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भात शहरातील अनेक हिंदू संघटनांनी मात्र मौन बाळगल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत. 
याबाबत प्राप्त माहिती अशी की, हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत मृतदेहांवर केला जाणारा अग्नी संस्कार किंवा मृतदेहाचा दफनविधी हा एक पवित्र विधी मानला जातो. त्यामुळे स्मशानभूमी म्हणजे हिंदू धर्मियांसाठी असलेले पवित्र वैकुंठ धाम असते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून पुसद नगरपरिषद आरोग्य विभाग प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे या नगर परिषद हद्दीतील माहजन पेट्रोल पंपाला लागून असलेल्या हिंदू स्मशानभूमीची अवस्था मात्र दयनीय आहे.या स्मशानभूमी परिसराला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या समशानभूमीत अनेक थडगे आहेत तरीसुद्धा या स्मशानभूमीची संरक्षण भिंत तोडून स्मशानभूमी परिसरात कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहे.तसेच बेकायदेशीरपणे अवैध प्रवासी वाहतूक ऑटो उभी करण्यात येत असून त्या ठिकाणी
आजूबाजूचे हॉटेलवाले, भाजीपाला विक्रेते प्रवासी वाहतूक ऑटो चालक याच परीसरात लघुशंका करतात, तसेच त्या परिसरात कचरा टाकतात, त्यामुळे या समशानभूमीला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले असुन या स्मशानभूमी परिसरात टाकलेला केरकचरा भटकी कुत्री मोकाट जनावरे पसरून देतात त्यामुळे कुजून गेलेला केरकचऱ्यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या स्मशानभूमीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या स्मशानभूमीची अत्यंत बिकट दुरावस्था झालेली दिसून येत आहे. माणसाचा अंतिम प्रवास म्हणजे मृत्यू होय. आयुष्यभर जीवन जगल्यानंतर अंत्यविधीसाठी त्याला चांगल्या ठिकाणची जागा उपलब्ध झाल्यास जीवन सार्थकी लागले असे समजल्या जाते. मात्र या समशानभूमीत मरणानंतरही माणसांना यातना सहन कराव्या लागत आहेत तरीही संबंधित नगरपरिषद प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दीपक सिंह परीहार यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाय योजना करून या स्मशानभूमी परिसरात कचरा टाकण्याला प्रतिबंध करावा, तसेच बेकायदेशीरपणे उभी करण्यात येत असलेले वाहने काढून या परिसरातील अतिक्रमण उचलून परिसर स्वच्छ करण्यात यावा तसेच या समशानभूमीचे सुशोभीकरण करून तात्काळ संरक्षण भिंतेचे बांधकाम करून ग्रील गेट बसवुन हिंदू समशानभूमीचे पवित्र जपावे अशी मागणी पुसद जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दीपक सिंह परिहार यांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.



