ईतर

पुसद नगर परिषदेने शासनाच्या निधीतून अव्वाच्या सव्वा खर्च करून मुख्य चौकात बसविलेल्या एलइडी टिव्ही पैकी दोन अखेर सुरू तर दोन एलइडी टिव्हीना मुहूर्त मिळेना; झेप न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट!

पुसद: शहरात नगर परिषदेने  महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासन व राज्य शासनाचा प्राप्त होणाऱ्या निधी नुसार स्वच्छ भारत अभियान (ना.) २.० अंतर्गत माहिती, शिक्षण, संवाद आणि वर्तनातील बदल अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेची व्यापक जनजागृती या कामासाठी प्राप्त होणारा निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक,मुखरे चौक, वसंतराव नाईक चौकात अव्वाच्या सव्वा खर्च दाखवून एलइडी टिव्ही बसविण्यात आल्या तेंव्हापासून त्या बंद असल्याने पुसद नगर परिषदेचा कारभार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा या मथळ्याखाली झेप न्यूज’ ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून या मुख्य चौकाच्या दोन चौकातील एलइडी टिव्ही दिपावलीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आल्या परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व वसंतराव नाईक चौकातील एलइडी टिव्ही सुरू करण्यास नगर परिषद प्रशासनाला मुहूर्त न मिळाल्याने संबंधित प्रशासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा ह्या एलइडी टिव्ही धुळखात आहेत.

पुसद नगरपरिषदेचा कारभार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा असाच सध्या पाहावयास मिळतआहे.शासनाच्या शहर स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत शिक्षण संवाद आणि वर्तमानातील बदल च्या कामासाठी आलेल्या निधीतून पुसद नगर परिषदेच्या कारभाऱ्याने नगर परीषदेच्या हद्दीतील शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, मुखरे चौक, वसंतराव नाईक चौकामध्ये दौंड येथील कंत्राटदाराला हाताशी धरून हजाराची इलेक्ट्रॉनिक वस्तू लाखो रुपये खर्चून बसविले हे एलईडी टीव्ही या शहरातील मुख्य चौकात केवळ शोभेच्या वस्तू बनल्या होत्या आणि शासनाचा निधी वाया गेला की काय असा प्रश्न सुद्धा नागरिक उपस्थित करू लागले त्यावेळी याची दखल झेप न्यूजने घेऊन यांचे वृत्त प्रकाशित करताच संबंधित नगरपरिषद प्रशासनाने या शहरातील महात्मा गांधी चौक व मुखरे चौक या मुख्य चौकातील एलईडी टीव्ही सुरू करून त्यावर जनतेसाठी जाहिराती प्रकाशित केल्या परंतु अजूनही वसंतराव नाईक चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य चौकातील ह्या एलईडी टीव्ही धुळखात पडून असल्याने या एलईडी टीव्ही सुरू करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला मुहूर्त मिळाला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.तर दुसरीकडे या कामांमध्ये लाखो रुपयाचा निधी खर्च अव्वाच्या सव्वा खर्च दाखवून संबंधित नगर प्रशासनाने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून हा अनियमिता केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.केवळ एका चार चाकी वाहनावरील १७ दिवसाच्या जाहिरातीसाठी जवळपास अंदाजे खर्च २३लाख८००० हजार रुपये तर एका एलईडी टीव्हीच्या खरेदीसाठी अंदाजे ५लाख५०हजार रुपये असा एकूण २७लाख ८६ हजार ९०० रुपयांच्या निधी संबंधित कंत्राटदारावर मुक्तपणे उधळण केल्याचे उघडकीस आले आहे.

त्यामुळे संबंधित प्रशासनाने या शासनाच्या निधीतून लाखो रुपयांचा खर्चून संबंधित कंत्राटदारा मार्फत शहरातील चार मुख्य चौकात हे डिजिटल फलक किंवा एलईडी टीव्ही बसविले आहेत मात्र, एलईडी टीव्ही बसविले तेव्हापासून आजपर्यंत एलईडी टीव्हीची योग्य देखभाल आणि नियोजनाच्या अभावामुळे हे टीव्ही सध्या धूळ खात आहेत त्यामुळे सध्या बंद असलेले हे एलईडी टीव्हीवरचा निधी वाया गेल्याची भावना जनतेत असल्याने पुसद शहरात संबंधित प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये संताप पहावयास मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close