पाण्यासाठी शेतकरीराजा चिंतेत; पुसद तालुक्यात पेरण्या थंडावल्या शेतकऱ्यांचे पाण्यासाठी राज्यमंत्री ॲड.इंद्रनील नाईक यांना साकडे!
उपविभागीय अधिकाऱ्यासह उपविभागीय पाटबंधारे सिंचन अधिकाऱ्यांना निवेदन!

पुसद: सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र जल स्तोत्र आटले आहे त्यामुळे तालुक्यात आगामी रब्बी हंगामावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. येत्या काळात पुरेशा पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचीच टंचाई जाणवणार आहेतर रब्बी पिकांना पाणी कुठून मिळणार, अशी स्थिती निर्माण होणार आहे. दुसरीकडे रब्बी हंगामात लागवडच झाली नाही, तर संपूर्ण ग्रामीण कृषी अर्थ व्यवस्थाच अडचणीत येणार आहे.त्यामुळे तालुक्यातील वालतुर, बान्सी, पिंपळखुटा, बजरंगनगर, गायमुखनगर, अश्विनपूर, येरांडा, मुंगशी, भोजला, निंबी, वनवारला, बोरी, बोरगडी, काकडदाती, तर गाजीपूर, कवडीपूर, वरुड, लोणी, आरेगांव, मोहा (ई), पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी राज्यमंत्री ॲड.इंद्रनिल नाईक यांना साकडे घातले असून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे व उपविभागीय पाटबंधारे विभाग यांच्याकडे निवेदन देऊन पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा ठेवून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावर्षी राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. खरीप हंगामात काहीच हाताशी आलेलं नसताना रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा रब्बी हंगामातील पिकांवर संकट येण्याची चिन्हे आहेत.या एल निनो च्या प्रभावामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामावर मोठे संकट कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरीप हंगामात पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पावसातील खंडामुळे काही भागांत पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी उत्पादनावर परिणाम होवून शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व पिकें करपली शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला गेला आहे. पावसाची मोठी तूट, दुष्काळी परिस्थिती आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर उद्भवलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आली आहे.त्यातच मायबाप सरकारने दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे दिवाळीचा सणांवर सुद्धा संकट निर्माण झाले आहे.
आतातर परतीच्या पावसाकडून अपेक्षा राहीली नाही त्याने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील मौजे वालतुर, बान्सी, पिंपळखुटा, बजरंगनगर, गायमुखनगर, अश्विनपूर, येडा, मुंगशी, भोजला, निंबी, वनवारला, बोरी, बोरगडी, काकडदाती, गाजीपूर, कवडीपूर, बरुड, लोणी, आरेगांव, मोहा (ई), पिंपळगाव मोहा, आरेगांव, येथील
शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना साकडे घातले असून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे व उपविभागीय अधिकारी पाटबंधारे सिंचन विभागाकडे निवेदन दिले असून यावर्षी पुस धरणांमध्ये 
७८%टक्के पाणी साठा असल्याने व तालुक्यात तिव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवुन रब्बी हंगामाकरीता शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. 
यंदा एल निनो च्या प्रभावामुळे पाऊस अपुरा पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून, ऐन दिवाळीच्या सणावर सुद्धा या दुष्काळाच्या दुःखाचे आणि चिंतेचे सावट पसरले आहे.शेतकरी टिकला तरच हा देश आणि आपली संपूर्ण सृष्टी टिकू शकेल भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा मुख्य कणा आहे.म्हणुन संबंधित प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल – डिंगाबर वसेकर पाटील संचालक बालाजी ॲग्रो एंजेन्सिज



