ईतर
अभिमानास्पद!राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कु. रेणू पवार ला सिल्वर मेडल; स्व. संभाजी पांडे ज्युनिअर कॉलेज सांडवा या विद्यार्थिनीचे सुयश!

पुसद : नुकतेच खोपोली जिल्हा रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा -२०२६-२७ मधील५३ किलो वयोगटात स्व. संभाजी पांडे ज्युनिअर कॉलेज सांडवा या विद्यालयाच्या विद्यार्थिनीन रेणू पवार हिने द्वितीय क्रमांक पटकावत सिल्वर मेडल पटकावले आहे.
या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्यानंतर पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील या विद्यालयाचा नाव राज्यस्तरावर नेल्यामुळे रेणू पवार हिच्यावर अभिनंदनचा वर्षाव सुरू आहे. रेणू पवार हिला तिचे आई- वडील विद्यालयाचे शिक्षक विजय कदमयांचे मार्गदर्शन लाभत आहे.तिचं अभिनंदन स्व. दत्तराव पांडे विद्यालय व जुनिअर कॉलेज सांडवा संस्थेचे सर्वे सर्व श्रीमती आशाताई पांडे, सनी पांडे, प्रफुल पांडे, संदेश पांडे तसेच मुख्याध्यापक आर. सी.चव्हाण व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या



