शैक्षणिक

माउंट लिट्रा झी स्कूल मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुसद न.प.च्या नगराध्यक्षा सौ.मोहिनीताई नाईक यांनी दिली प्रेरणेची नवी दिशा!

पुसद : येथील माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये व्हॉइस ऑफ इन्स्पिरेशन (प्रेरणादायी आवाज)या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुसदचे विद्यमान नगराध्यक्षा मोहिनी ताई नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहिनीताई नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार स्कूल गव्हर्नर ,स्कूल कॅप्टन व व्हॉइस कॅप्टन,ज्यु.स्कूल कॅप्टन व ज्यु. व्हॉइस कॅप्टन यांच्या हस्ते करण्यात आले.सदर शाळेचे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोहिनीताई नाईक यांच्या घरी जाऊन सदर कार्यक्रमास येण्याची विनंती केली. व या चिमुकल्यांच्या विनंतीस मान देऊन मोहिनीताई यांनी दि५ ऑक्टोबर २०२६ रोजी या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमात ४० विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व पुसदच्या विकासात्मक ध्येय, धोरणावर आधारीत अनेक प्रश्न विचारले. तसेच अमायरा हिराणी या विद्यार्थिनीचा अपघात झाला असल्या कारणाने सदर विद्यार्थ्यीनी शाळेत येणे शक्य नव्हते. तरी सुद्धा या विद्यार्थिनींने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रश्न विचारले. ताईंनी सुद्धा अतिशय समर्पक पणे प्रश्नांची उत्तरे दिली. राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या ताईंना विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारणे खरोखरच विद्यार्थ्यांसाठी कौतुकाची गोष्ट आहे. ताईंनी विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासाचे व खेळाचे महत्व , स्वच्छतेचे महत्व, पाण्याची बचत ,भारतीय संस्कृती ,इतिहास, लोकशाही शासन व्यवस्था, लोकप्रतिनिधींची व नागरिकांचे कर्तव्ये आई-वडील व गुरुजनांची शिकवणीचे महत्व अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच सदर शाळा संगीत, कला, सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच क्रिडा क्षेत्रामध्ये सुद्धा नेत्र दिपक यश प्राप्त करीत आहे. तसेच स्कॉलरशिप परीक्षेत अन्वी पाटील या विद्यार्थीनीचा जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला. तर अथर्व खटके (अकरावा क्रमांक) तर आरोही राऊत ही विद्यार्थीनी सोळाव्या क्रमांकावर यश प्राप्त केले.जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत २० गोल्ड मेडल ,१२ सिल्वर मेडल, व राज्यस्तरीय टेबल टेनिसमध्ये ५ ब्रांझ मेडल प्राप्त केले प्राप्त केले.तसेच वयोगट १९ मध्ये पार्थ पवार ,अर्णव खापरे, अर्णव पाटील , सोम चिद्दरवार नरेन डवले व वयोगट १४ मध्ये ईशांत चांडक, शिवम डोक या सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली.सदर शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे दूरदृष्टीकोन ठेवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवत असल्याचे मत प्रतिपादन मोहिनीताई नाईक यांनी व्यक्त केले. तसेच मोहिनीताई विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना अर्थजीत पानपट्टे या विद्यार्थ्यांनी मोहिनीताईंचे हुबेहूब चित्र काढले. सदर चित्र ताईस भेट दिले.सदर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे फेसबुकवर व यूट्यूब चैनल वर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. काही तासात फेसबुकवर ७७०० व्ह्यूज मिळाले तर युट्युब वर २८२० व्ह्यूज मिळाले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडणारे प्रश्न व त्यांच्या जिज्ञासू वृत्ती व विद्यार्थ्यांना मिळालेल्या व्यासपीठामुळे पालक आनंदित झाले.सदर कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावे यासाठी अकॅडमिक डायरेक्टर ,शाळेचे मुख्याध्यापक, प्रशासनाधिकारी ,शाळा समन्वयक, सर्व क्रिडा प्रशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाश खंदारे यांनी केले तर आभार सानवी नवलकर या विद्यार्थ्यांनीने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close