राजकिय
सरपंचपदांचे आरक्षण जाहीर झाल्याने ‘कही खुशी कही गम’ अनेकांचे स्वप्न उजळले तर काहींचे झाकोळले!
१३५ ग्रामपंचायतीं पैकी ६९ ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण जाहीर !

- पुसद:तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीत ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले. तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीमधील सन २०२५ते २०३० या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत योगा भवन दवा बाजार येथे (ता.१९) सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसिलदार रेखा वाणी व संजय जोशी यांच्या उपस्थित ही सोडत ईश्वर चिट्ठीद्वारे पार पडली या सोडतीत अनेक उलटफेर झाले असून सरपंच पदासाठी बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला असून अनेकांना अनपेक्षितपणे सोडत लागल्याने उत्साह दिसून येत होता तर बहुतांश मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे आरक्षित झाल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. यात अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याने ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पाहायला मिळाले तर तालुक्यातील १३५ ग्रामपंचायती पैकी ६९ ग्रामपंचायती ह्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यातील १८ ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जाती साठी राखीव तर२१ ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमातीसाठी आणि २१ ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. तसेच ७५ ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचा पाहवयास मिळत आहे तर काहींचे स्वप्न उजळले तर काहींचे झाकोळले आहेत अनेकांच्या गावांचे सरपंच पद त्यांच्या सोयीने न सुटल्याने त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीत उतरणे अवघड झाले असले तरी ते कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

- ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढीलप्रमाणे :-१) कोपरा बु. – अनु. जाती, २) घाटोडी – अनु. जाती, ३) चोंढी – अनु. जाती महिला, ४) जनुना – अनु. जाती, ५) दहीवड बु. – अनु. जाती महिला, ६) नानंद खुर्द – अनु. जाती, ७) पारवा – अनु. जाती, ८) फेट्रा – अनु. जाती महिला, ९) बान्सी – अनु. जाती महिला, १०) ब्राह्मणगाव – अनु. जाती महिला, ११) भंडारी – अनु. जाती महिला, १२) मरसुळ – अनु. जाती, १३) मांजरजवळा – अनु. जाती, १४) माणिकडोह – अनु. जाती, १५) येलदरी – अनु. जाती महिला, १६) राजना – अनु. जाती महिला, १७) हर्षी – अनु. जाती महिला, १८) हिवळणी त. – अनु. जाती, १९) आरेगाव – अनु. जमाती महिला, २०) कुंभारी – अनु. जमाती, २१) कृष्णनगर – अनु. जमाती महिला, २२) खडकदरी – अनु. जमाती महिला, २३) गहुली – अनु. जमाती, २४) गौळ खु. – अनु. जमाती, २५) चिंचघाट – अनु. जमाती, २६) जवळा – अनु. जमाती, २७) जामनाईक-१ – अनु. जमाती, २८) देवठाणा – अनु. जमाती, २९) नांदुरा ई – अनु. जमाती महिला, ३०) फुलवाडी – अनु. जमाती महिला, ३१) बुटी – अनु. जमाती महिला, ३२) बेलोरा बु. – अनु. जमाती महिला, ३३) मोप – अनु. जमाती, ३४) मोहा ई. – अनु. जमाती महिला, ३५) रामपूरनगर – अनु. जमाती, ३६) रोहडा – अनु. जमाती महिला, ३७) लाखी – अनु. जमाती महिला, ३८) वडगाव – अनु. जमाती, ३९) शिळोणा – अनु. जमाती महिला, ४०) इंदिरानगर – ना. मा. प्र., ४१) भोजला – ना. मा. प्र., ४२) ईसापूर – ना. मा. प्र. महिला, ४३) उडदी – ना. मा. प्र. महिला, ४४) काकडदाती – ना. मा. प्र., ४५) काटखेडा – ना. मा. प्र. महिला, ४६) खंडाळा – ना. मा. प्र. महिला, ४७) पार्डी – ना. मा. प्र. महिला, ४८) बोरगडी – ना. मा. प्र., ४९) वरूड – ना. मा. प्र. महिला, ५०) श्रीरामपूर – ना. मा. प्र., ५१) सावरगाव बु. – ना. मा. प्र., ५२) सिंगरवाडी – ना. मा. प्र., ५३) गायमुखनगर – ना. मा. प्र. महिला, ५४) गौळमांजरी – ना. मा. प्र., ५५) जमशेटपूर – ना. मा. प्र. महिला, ५६) मांडवा – ना. मा. प्र., ५७) सावंगी – ना. मा. प्र. महिला, ५८) हिवळणी पा. – ना. मा. प्र., ५९) कार्होळ – ना. मा. प्र. महिला, ६०) शिवणी – ना. मा. प्र. महिला, ६१) अनसिंग – सर्वसाधारण महिला, ६२) आडगाव – सर्वसाधारण, ६३) आमटी – सर्वसाधारण महिला, ६४) आसोली – सर्वसाधारण, ६५) ईनापूर – सर्वसाधारण, ६६) कारला – सर्वसाधारण, ६७) कोंढई – सर्वसाधारण, ६८) खर्षी – सर्वसाधारण महिला, ६९) खैरखेडा – सर्वसाधारण, ७०) गाजीपूर – सर्वसाधारण महिला, ७१) जगापूर – सर्वसाधारण, ७२) जमनीधुंदी – सर्वसाधारण, ७३) जांबबाजार – सर्वसाधारण, ७४) जामनाईक-२ – सर्वसाधारण, ७५) ज्योतीनगर – सर्वसाधारण महिला, ७६) दुधागीरी – सर्वसाधारण, ७७) धनकेश्वर – सर्वसाधारण महिला, ७८) धनसळ – सर्वसाधारण, ७९) धानोरा ई – सर्वसाधारण, ८०) निंबी – सर्वसाधारण, ८१) पन्हाळा – सर्वसाधारण महिला, ८२) पांढुर्णा खुर्द – सर्वसाधारण, ८३) पांढुर्णा बु. – सर्वसाधारण महिला, ८४) पिंपळखुटा – सर्वसाधारण महिला, ८५) पिंपळगाव ई – सर्वसाधारण महिला, ८६) पिंपळगाव मुं. – सर्वसाधारण महिला, ८७) पोखरी – सर्वसाधारण, ८८) मारवाडी खु. – सर्वसाधारण महिला, ८९) मारवाडी बु. – सर्वसाधारण, ९०) माळआसोली – सर्वसाधारण, ९१) मोखाड – सर्वसाधारण, ९२) म्हैसमाळ – सर्वसाधारण महिला, ९३) लोणदरी – सर्वसाधारण महिला, ९४) लोणी – सर्वसाधारण, ९५) लोहारा ई – सर्वसाधारण महिला, ९६) वडसद – सर्वसाधारण महिला, ९७) वनवार्ला – सर्वसाधारण, ९८) वसंतवाडी – सर्वसाधारण महिला, ९९) वालतूर तांबडे – सर्वसाधारण, १००) वालतुर रे – सर्वसाधारण महिला, १०१) वेणी खु. – सर्वसाधारण महिला, १०२) शेबाळपिंप्री – सर्वसाधारण महिला, १०३) शेलू खु. – सर्वसाधारण, १०४) शेलू बु. – सर्वसाधारण, १०५) सांडवा – सर्वसाधारण महिला, १०६) हनवतखेडा – सर्वसाधारण महिला, १०७) हुडी बु. – सर्वसाधारण महिला, १०८) हेगडी – सर्वसाधारण महिला, १०९) होरकड – सर्वसाधारण, ११०) गौळ बु. – सर्वसाधारण, १११) चिकणी – सर्वसाधारण, ११२) जवळी – सर्वसाधारण महिला, ११३) दगडधानोरा – सर्वसाधारण महिला, ११४) नानंद ईजारा – सर्वसाधारण महिला, ११५) बिबी – सर्वसाधारण, ११६) बोरी खु. – सर्वसाधारण, ११७) बोरी मं. – सर्वसाधारण, ११८) मुंगशी – सर्वसाधारण महिला, ११९) सावरगाव गोरे – सर्वसाधारण महिला, १२०) हुडी खु. – सर्वसाधारण महिला, १२१) पारवा खुर्द – सर्वसाधारण, १२२) लोहरा खुर्द – सर्वसाधारण, १२३) सेवादासनगर – सर्वसाधारण महिला, १२४) धनसिंगनगर – सर्वसाधारण महिला, १२५) अश्विनपूर – सर्वसाधारण महिला, १२६) नंदिपूर – अनु. जाती महिला, १२७) रामनगर – ना. मा. प्र. महिला, १२८) आरेगाव खुर्द – अनु. जाती, १२९) पारध – अनु. जमाती, १३०) पिंपळगाव – अनु. जमाती महिला, १३१) रामपूर – ना. मा. प्र., १३२) शिवानगर – सर्वसाधारण, १३३) बजरंगनगर – अनु. जमाती महिला, १३४) उपनवाडी – सर्वसाधारण, १३५) वाघजाळी – सर्वसाधारण महिला.




