ईतर

प्रा.डॉ.अनुश्री अनिल पुरी (बन) यांची गोसावी सेना महाराष्ट्र राज्य विदर्भ अध्यक्ष महिला आघाडी पदी नियुक्ती!

पुसद :श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. अनुश्री पुरी(बन) महिला अध्यक्ष लघु उद्योग भारती पुसद तथा प्रोप्रायटर ऐश्वर्या ऍग्रो इंडस्ट्रीजच्या यशस्वी महिला उद्योजक व समाजशास्त्राच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.अनुश्री पुरी(बन) यांची गोसावी सेना महाराष्ट्र राज्य विदर्भ अध्यक्ष (महिला आघाडी) पदी सामाजिक कार्यासाठी नियुक्ती गोसावी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.कैलास गंगागिर गोसावी साहेब यांच्या हस्ते निवड झाली असून हि निवड यवतमाळ जिल्ह्याचे गोसावी सेनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री.मनोज रामचंद्र गिरी साहेब (सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक) यांच्या उपस्थितीत दि.३ सप्टेंबर २०२६ रोजी विदर्भ अध्यक्ष महिला आघाडी म्हणून पदावर नियुक्ती करून जवाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल विदर्भातील नागपूर,अमरावती या दोन्ही विभागातील सर्व जिल्हे तसेच तालुक्यातील अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व ग्रामीण भागातील गोसावी समाजाने निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला असून पुढील सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.डॉ.अनुश्री अ.पुरी यांनी अनेक वर्षांपासून समाज सहभाग समाजाप्रती वेळेवेळी केलेले कार्य आणि सहकार्य कर्तव्य आणि जबाबदाऱ्यां पार पाडल्या असून त्यां शैक्षणिक,सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक वर्षांपासून कार्यरत असण्याचा अनुभव हे समाजाला आणि महिलांना तसेच भावी पिढींना भविष्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल असा उदांत हेतू ठेवून गोसावी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.कैलास गंगागिर गोसावी साहेब यांनी त्यांच्या उपरोक्त कार्याची दखल घेत नियुक्ती केली आहे.डॉ.अनुश्री पुरी यांनी विदर्भ अध्यक्ष (महिला आघाडी) नम्रपणे या पदाचा स्वीकार करत आपल्या समाजाप्रती दिलेल्या जबाबदाऱ्या निस्वार्थी व प्रमाणीपणे समाज बांधव व महिला भगीनी यांच्या सेवेप्रती आणि न्यायासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही देत त्यांनी आपले पुढील गोसावी सेना विदर्भ अध्यक्ष ( महिला आघाडी )समाज कार्य सुरू केले असून आपण समाजाचे देणे लागतोय ह्या उद्देशातून डिझींटल युगात वेळात वेळ काढून समाजाने व विशेष आपल्या समाजातील महिंलांनी  एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करावे असे आवाहन डॉ.अनुश्री पुरी यांनी गोसावी समाजाला केले आहे.  गोसावी समाजाच्या विद्यार्थ्यांना व महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे. महिलांच्या अडी- अडचणी दूर करणे उद्योगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणे व गरजूवंत महिलांना शासकीय योजनाचा लाभ मिळवून देणे.समाजउपयोगी सामजिक मेळाव्याचे आयोजन महिलांच्या हक्क व अधिकारासाठी लढा देऊन महिलांना न्याय मिळवून देणे अशी समाज व महिलांसाठी सामाजिक कार्याची रूपरेखा संस्थापक अध्यक्ष श्री. कैलास गंगागिर गिरी साहेब यांच्या नेतृत्वाखालील व समाज सहकार्यानीं सामाजिक जबाबदारीच्या पदाला न्याय देण्याचे ठरवत त्यांनी गोसावी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षांनी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत तसेच विदर्भातील सर्व जिल्हे आणि तालुक्यातील गोसावी सेनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सर्व गोसावी समाज बांधव व महिला भगिनिने कौतुक करत,अभिनंदनाचा वर्षांव करून सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचेही डॉ.अनुश्री पुरी यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close