आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने शंभरहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव!

पुसद : येथे आदिवासी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन नोंदणी क्रं.एनजिपी५८८७ तालुका शाखा पुसद यांच्या वतीने दहावी, बारावी, निट,आयआयटी तसेच विविध शासकीय सेवेत यश संपादन केलेल्या शंभरहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा राजे उदाराम मंगल कार्यालय, पुसद येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष मा. लक्ष्मण टारफे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. शिवाजी भुरके यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कु. नेहा रामराव कबले, कृषी उपसंचालक आणि मा. श्री. सुरेश धनवे सर उपस्थित होते.
“ध्येय निश्चित करा आणि सातत्याने मेहनत करा” कु. नेहा कबले (कृषी उपसंचालक)
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कु. नेहा रामराव कबले, कृषी उपसंचालक यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र सांगितला.त्या म्हणाल्या, “मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत किंवा आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सर्वात आधी आपली आवड ओळखा. ज्या विषयात किंवा क्षेत्रात तुम्हाला खरोखर रस आहे, त्या क्षेत्राची निवड करा. अनेक गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा एका ध्येयावर पूर्ण ताकदीने लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी सातत्याने अभ्यास करा.”त्या पुढे म्हणाल्या, “मोठे यश एका दिवसात किंवा काही महिन्यांत मिळत नाही. त्यासाठी टप्प्याटप्प्याने तयारी करणे गरजेचे असते. कठोर परिश्रम (Hard Work), सातत्य (Consistency), आत्मविश्वास (Self-Confidence) आणि प्रबळ इच्छाशक्ती या चार गोष्टींची साथ असेल, तर यश नक्कीच मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयत्न करत राहावे. अडचणी आल्या म्हणून थांबू नका; जोपर्यंत ध्येय गाठत नाही, तोपर्यंत मेहनत थांबवू नका.”विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला मा. संभाजी सरकुंडे माजी IAS मा. माधवराव वैद्य (सेवानिवृत्त उपायुक्त), मा. डॉ. गणेश वानोळे (सहायक आयुक्त, पशुसंवर्धन), मा. शेषराव पांडे (माजी पोलीस अधीक्षक), मा. वाघुजी खिल्लारे (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक), मा.डॉ.अर्चना भुरके (पाचपुते)मा. किरण मिराशे (सहायक लेखाधिकारी), मा. माणिकराव मोहेकर (सभापती, पंचायत समिती पुसद), मा. गणेशराव इंगळे (जि. प. सदस्य), मा. गजानन उघडे (जि. प. सदस्य), मा. शिवशंकर वंजारे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), मा. सौ. मीराबाई किसन काळे (पंचायत समिती सदस्य), मा. गजानन फोपसे (पंचायत समिती सदस्य), मा. विलास पिंपळे (विस्तार अधिकारी, पंचायत) मा. दिनेश खेकाळे राज्य सचिव मा. गंगाराम काळे, राज्य कार्यकारणी सदस्य मा. परमेश्वर मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य मा. संजय बुरकुले, राज्य कार्यकारणी सदस्य मा. पांडुरंग व्यवहारे (विदर्भ अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड), मा. गणपत गव्हाळे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद), मा. देविदास डाखोरे (जिल्हाध्यक्ष, आदिवासी पँथर संघटना), मा. सौ. वर्षाताई वैद्य (अध्यक्ष, आदिवासी मुंगसाजी पतसंस्था, लक्ष्मी नगर), मा. पुंडलिक टारफे (संचालक, सूतगिरणी पिंपळगाव), मा. नारायण कऱ्हाळे (आदिवासी सेवक), मा. सुखदेव फोपसे (जिल्हाध्यक्ष, यवतमाळ आदिवासी कर्मचारी संघटना), मा. संजय चिरंगे (जिल्हा कार्याध्यक्ष), कु. सुनंदा ठाकरे (जिल्हा उपाध्यक्ष, महिला), कु. दीपमाला व्यवहारे (जिल्हा कार्यकारणी सदस्य), मा. भास्कर मुकाडे (तालुकाध्यक्ष, आफ्रोड संघटना), मा. विठ्ठल मळघणे (वनपरिक्षेत्र अधिकारी) मा.दिगंबर बळी मा.नायब तहसीलदार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.शंभ हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानसत्कार सोहळ्यात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणारे विद्यार्थी, NEET व IIT सारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी तसेच MBA, PHD मध्ये यश मिळविणारे विद्यार्थी, विविध शासकीय सेवेत अधिकारी व कर्मचारी म्हणून निवड झालेले विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करतानाच इतर विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विविध क्षेत्रांत पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकर्त्यांचे परिश्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंजाब बेले,रामप्रसाद उघडे, अनिल दुम्हारे, संतोष डाखोरे, कु. तेजस्वी इंगळे, मारुती घुक्से, विश्वनाथ रणमले, उद्धव धोंगडे, संतोष तडसे, संदीप ससाने, पवन सातपुते, काशिनाथ बोके, कैलास बोंबले, नारायण मुरमुरे, गजानन वंजारे, चंद्रकांत डहाके, भगवान भोरकडे, गणेश फोपसे, शंकर माहुरे, सतीश धनवे, नागोराव खोकले, पुंजाराम इंगळे, श्री. किसन ठाकरे, बाबुराव बोंबले, रामकृष्ण वाडगे, तुकाराम धनवे, संजय मोरे, गोविंद मस्के, बाळू पाचपुते, वर्षा इंगळे, चंद्रकांत मळगणे, सुनील वाडगे, सुरेश बोके, नामदेव पिंपरे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष श्री. रामप्रसाद उघडे यांनी केले. कु. वर्षा इंगळे मॅडम व श्री. अनिल दुम्हारे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर श्री. काशिनाथ बोके यांनी आभार प्रदर्शन केले.आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम पुसद परिसरात प्रेरणादायी ठरला. “गुणवंतांचा सन्मान, विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि समाजाच्या प्रगतीला नवी दिशा”* या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.



