ईद-ए-मिलादुन्नबीच्या मुहूर्तावर १४ जोडप्यांचा इज्तेमाई विवाह सोहळा;पुसद येथे पैगम्बराच्या जयंतीनिमित्त समाजा समोर वेगळा आदर्श!

पुसद : ईद-ए-मिलादुन्नबीच्या मुबारक मुहूर्तावर पुसद येथे गरजू व गरीब कुटुंबातील मुले व मुलींसाठी इज्तेमाई शाद्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांत एकूण १४ विवाह जोडपे इज्तेमाई शाद्या(लग्न) पार पडन्यात आले.
हा महिना इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद पैंगबर यांची जयंतीचा पवित्र महिना असतो या पवित्र महिन्याचे वास्तव्य जनते समोर आणणे व त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या जयंतीत फिजूल खर्च व डीजे संस्कृतीला आळाघालून त्या ऐवजी समाज उपयोगी दिन दलित समाजातील शेवटच्या घेतकाचे कल्यान करण्याची संकल्पना समोर ठेऊन नूर बहूउदेशीय संस्थे ने साध्या पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केला. गरीब व गरजू कुटुंबांना आधार देऊन समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण करणे, हा उद्देश समोर ठेऊन विवाह मेळावा घेण्यात आला.मेळाव्याचे अध्यक्ष ठिकाणी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. मोहम्मद नदीम होते.
तर उदघाटन व प्रमुख उपस्थिती नवनियुक्त अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष तथा आमदार साजित खान पठाण होते.प्रमुख उपस्थिती
अमर मानसिंग मोहिते साहेब (उपविभागीय पोलिस अधिकारी, पुसद)मौलाना युनूस बुखारी काझी सदरिद्दीन शहर काझी,अब्दुल जब्बार ठेकेदार ताहेर इराणी जावेद भाई ठेकेदार युनुस मकरानी होते.सदर विवाह मेळावा मध्ये वर वधू जोडपे शोधणे व त्यांना या उपक्रमचा लाभ देण्या बाबत मार्गदर्शन करून त्यांना सहभागी करून घेण्यासाठी महत्वाचे कार्य व अथक परिश्रम प्रदेश अल्प. महासचिव सैय्यद इशतियाक यांनी केले.कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रा. आदिल मिर्झा व झिया शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन तहेसीन खान यांनी केले.
विवाह मेळाव्याच्या यशस्वीते करिता सामाजिक कार्यकर्ते सय्यद जानी,नगरसेवक जब्बार लाखे, गाझी उसामा, फिरोज खान,इर्शाद कुरेशी,नूर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शेख मोहसीन शेख रसुल
सय्यद राजीक सय्यद नुरोद्दीन उपाध्यक्ष सलमान सय्यद लुकमान (सचिव)असद खान बुडन खान (सहसचिव)
सिराज खान हसन खान (कोषाध्यक्ष)शेख अतिक शेख खेरु (सदस्य)इर्शाद सैफुल्लाखॉअकबर खान बशीर खान,फुरकान खान जमील खान (सदस्य)सय्यद शाला सय्यद लालअमजद खान हसन खानशेख रिज़वान शेख मलंग,सय्यद नाज़ीम सय्यद मोबीन ,सय्यद अनिस सय्यद अमीर,साजीद खान मजीद खान,असलम खान रहेमत खान,मोहम्मद जुबेर अब्दुल लतीफ,सोहीम खान सिकंदर खान,शेख आदील शेख खैरु,रेहान खान रियाज़ खान,सय्यद गफ्फार सय्यद लाल,शेख रफीक शेख करीम,शेख दानिश शेख अन्सार अब्दुल कादर अब्दुल मजीदअरबाज़ खान अकबर खान शेख वसीम शेख इब्राहीम शेख रेहान शेख रिज़वान शेख फिरज्ञान बाबा,सय्यद जमील,सय्यद शब्बीर शेख फैज़ान बाबा, शेख अनिस,सोहीलखान ,शेआज़म साबीर शेख अब्दुल इलियास एजाज सरमत खान अश्पाक मिर्ज़ा सह युवक मंडळीचा उत्स्फूर्त सहभाग होता.



