पुस नदीवरील पुलाचे अर्धवट बांधकाम देत आहे अपघाताला निमंत्रण; सबंधित कंत्राटदारवर कारवाईची मागणी

पुसद : कंत्रादाराच्या ढिसाळ कारभारामुळे पुस नदीवरील पुलाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू आहे अनेक ठिकाणी अर्धवट असलेले काम त्या परिसरातील ये -जा करणाऱ्या वाहनधारकासाठी अपघातांना निमंत्रण देत असून पुलाच्या ठिकाणी कोणतेही चेतावणी फलक नसल्याने रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात घडत आहेत. या मार्गावरून नागपूर -दिग्रस -माहूर मार्गाला प्रवास करता येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते. त्यामुळे हा मार्गावरील पुलाचे बांधकाम त्वरित होणे अत्यंत गरजेचे आहे. गेले तीन वर्ष फक्त सारवासारव करण्याचा प्रयत्न करून संबंधित कंत्राटदार वेळकाढूपणा करत आहे. हे स्पष्ट होत असल्याने वाहनधारकासह नागरिकाकडून तसेच लोकप्रतिनिधी कडून सुद्धा संताप व्यक्त होत आहे.
पुसद सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यक्षेत्रात पुस नदीवर मागील दोन ते तीन वर्षापासून जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु अंदाजे ३० महिन्यांचा दीर्घ कालावधी उलटूनही पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे.पुसद शहरातून नागपूर, दिग्रस माहूर येथे जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावरील हा पूल संबंधित मूळ कंत्राटदार आणि सब कंत्राटदाराच्या कारभारामुळे थंडबस्त्या असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पुलाचे बांधकाम अपूर्ण असताना पुलावरील एक लेन वाहतुकीला खुली करण्यात आली आहे तर संबंधित कंत्राट दाराने सुरक्षेच्या दृष्टीने या बांधकामाच्या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक ना चेतावणी फलक ना रिफ्लेक्टर फलक,ब्लिंकर किंवा लाल दिवे न लावल्याने तसेच कामाचा फलक त्यावर सबंधित कंत्राटदाराचे नाव यावर देखरेख करणाऱ्या अभियंत्याचे नाव आणि कोणत्या निधीतून या रस्त्याचे काम सुरू असल्याचे विवरण लावणे बंधनकारक असताना सुद्धा संबंधित विभागाने किंवा कंत्राट दराने या ठिकाणी कुठलेही फलक लावले नाही उलट पुलावर उघडे खड्डे अपूर्ण बांधकाम रात्रीच्या वेळी किंवा अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देत आहे.मात्र ही घाई गडबड सुरक्षित प्रवासाला छेद देत सुरू असून वाहनधारकासाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत तर प्रवाशांना या पुलावरून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. अशीच घटना दोन-तीन दिवसापूर्वी मोटर सायकलवरून जात असताना प्रेम पवार रा.शिवाजी वार्ड पुसद या तरुणाला अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात घडला असून त्याच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ते यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीमध्ये व वाहनधारकासह सर्वसामान्य नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या पुलाचे बांधकाम कधी पूर्ण हाेणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या पुलाचे कामात संतगती आणि निकृष्ट दर्जामुळे या पुलाच्या कामाचा दर्जा हि खालावला असल्याने पुलाच्या बांधकामावर व गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करण्यात येत आहे. या बांधकामा बाबत कंत्राटदाराला वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांनी व लोकप्रतिनिधींकडून सूचना देण्यात आल्या होत्या तरीही सबंधित कंत्राटदाराची व सार्वजनिक बांधकाम विभागाची मनमानी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या या पुलाचे काम संथगतीने सुरू असताना मात्र अंतिम टप्प्यात घाई गरडबडीत सुरू आहे पुलाचे काम मागील दोन-तीन वर्षापासून रखडल्यामुळे प्रवासीवर्गाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी या कामाकडे मूळ कंत्राटदाराने लक्ष नसल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाकडे नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती राजू सोळंके अपघातग्रस्त तरुणाची आई सौ. योगिता दीपक पवार यांनी तक्रार दाखल केली असून संबंधित कंत्राटदारासह संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.जर हे कंत्राटदार लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना आहेत. जुमानत नाहीत यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित मूळ कंत्राटदाराला व सब कंत्राटदाराला तात्काळ काम पूर्ण करण्यास समज द्यावी आणि काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी येथील नागरिक व प्रवासी, वाहतूकदार यांच्या कडून केली जात आहे.



