अवैधरित्या धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या इसमास अटक; उमरखेड डिबी पथकांची प्रशंसनीय कामगिरी!

उमरखेड: पोलीस स्टेशनच्या हद्दीत शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मोहीम सुरू असताना पोलिस स्टेशनच्या हद्दीत नागापूर रुपाळा गावातील परीसरात एक इसम लोखंडी धारदार तलवार जवळ बाळगून असल्याची माहिती खबऱ्याद्वारे डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे डि.बी. पथकाने नागापूर रुपाळा येथे एका इसमाला धारदार लोखंडी तलवारीसह अटक केली असून, उमरखेड पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
सुशांत किशोर चाफेकर वय १९ वर्ष, रा. नागापूर रूपाळा उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि.१६जुन२०२६ रोजी दुपारी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डि.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी.बी. स्टाफ असे जिल्ह्यांमध्ये अवैध्य शस्त्र बाळगणा-यां विरूध्द चालू असलेल्या कारवाई माहीम संबंधाने पेद्रोलिंग करत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारांकडून माहीती मिळाली की, नागापूर रूपाळा येथील इसम नामे सुशांत किशोर चाफेकर हा स्वतः जवळ धारदार लोखंडी तलवार बाळगून आहे, यावरून ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ साहेब यांना माहीती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी.बी. स्टाफ यांनी पंचासह रवाना होवून नागापूर रूपाळा येथे १३.४५ वा. दरम्यान सापळा कारवाई करून मिळाले माहीती प्रमाणे इसम नामे सुशांत किशोर चाफेकर वय १९ वर्ष, रा. नागापूर रूपाळा उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांस ताब्यात घेवून मिळाले माहीती प्रमाणे तलवार बाबत विचारपूस केली असता त्याने त्याचेकडे तलवार असल्याची व ती घराशेजारील झुडपात लपवून ठेवली असल्याचे बोट करून दाखविले त्याप्रमाणे सोबतचे पंचाचे समक्ष त्याने स्वतः ती बाहेर काढून दाखविली ती पंचनामा करून जप्त केली आहे. अशा प्रकारे एकूण ३० इंच लांबीची धारदार लोखंडी तलवार कि. रू. ५००/- ची जप्त करण्यात आली असुन, त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. हुनमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. व्यंकट गंगलवाड, डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो. हवा. चंदन जाधव, पो. शिपाई दिगांबर गिते, पो. शिपाई संघशील टेंबरे सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



