ईतर

डॉ.अनुश्री पुरी (बन) यांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025 च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुसद:रिसील डॉट इन (शुअर मी मल्टीपर्पज प्रा.लि.व इंडिया आयकॉन मॅगझिन तर्फे दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक येथील महाराष्ट्र या महामंचावर सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र प्र. विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या महिला उद्योजक म्हणून प्रा.डॉ.अनुश्री अनिल पुरी (बन) यांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025 चा पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री मा.प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.या अवॉर्ड सोहळाला मा.श्री.सुधीर कुमार पठाडे मराठी फिल्म प्रोड्युसर तथा फाउंडर व मुख्यकार्यकारी अधिकारी रिसिल अवॉर्ड्स यांची उपस्थितीत लाभली असुन महाराष्ट्रातील उद्योजक आणि रिशील डॉट इन या टीमच्या उपस्थिती हा पुरस्कार सोहळा पार पडला.

डॉ.अनुश्री पुरी यांना तालुका महिला अध्यक्ष, लघु उद्योग भारती पुसद व ऐश्वर्या ऍग्रो इंडस्ट्रीजच्या प्रोप्रायटर महिला उद्योजक म्हणून कच्ची घाणी खाद्य तेलाचा व्यवसाय उभा केला असून या व्यवसाय अंतर्गत कच्ची घाणी खाद्यतेलाचे अनेक प्रकारचे तेल तयार केल्या जाते. त्यामध्ये शेंगदाणा,सूर्यफूल, सरसो,जवस, तीळ करडी, खोबरेल इत्यादी तेलाचे उत्पादन त्यांनी स्वतः तयार केले आहेत. या तेला सोबतच शेंगदाणा, जवस, तीळ इत्यादी तेल बियाच्या ढेपीपासून खाण्याकरिता अनेक प्रकारच्या चटण्या व मसाले बनवले आहेत,त्यांनी गृहीणींना व ग्राहकांना या विषयी वेळोवेळी सविस्तर माहिती देऊन आरोग्यासाठी किती उपयोगी आहे व कमी खर्चामध्ये प्राकृतिक पद्धतीने तयार करण्यास आणि स्वयंपाकगृहात ढेप महत्त्वाची आहे याचे महत्व पठवून देऊन अनेक महिलाना व ग्राहकांना मदतीचा हात पुढे केलेला आहे. अनेकांचा असा समज होता की, ढेप हि फक्त गुरांचा खाद्य आहे .पण तसे नसून ढेप हि मानवाच्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे.हे त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून महिला व ग्राहकापर्यंत या व्यवसायच्या माध्यमातून पोहचला आहे तसेच ग्राहक जोडण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.

 त्याच्या सकारात्मक विचारातून प्राध्यापक ते महिला उद्योजक म्हणून इंडिया आयकॉन मॅगझिन मध्ये त्यांच्या व्यवसायाची यशोगाथा आर्टिकल सुद्धा छापण्यात आले आहे. त्या सोबतच सुप्रसिद्ध अभिनेत्री मां.वर्षा ऊसगावकर, मा.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मा.अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या समवेत महाराष्ट्रचा अभिमान व उद्योजकाचा सन्मान अश्या क्रिएटिव्हचा सन्मान मिळाला असून समाचार वाणी न्यूज या चॅनलवर कच्ची घाणी खाद्य तेल या यशस्वी व्यवसायाची मुलाखात घेण्यात आली आहे.डॉ.अनुश्री पुरी हया महाराष्ट्र बिझनेस आयकॉन विजेत्या ठरल्या आहे. तेव्हा रिसिल डॉट इन टिम तसेच त्यांच्यावर कुटुंब,उद्योजक व सहकाऱ्यांनी अभिनंदनचा वर्षाव करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close