ईतर

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना (उबाठा) च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे साजरी!

पुसदः  येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने दि. २३ जानेवारी २०२६ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तथा जन्म शताब्दी निमित्ताने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. पुसद शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिम `चे पुजन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. तद्नंतर पुसद-वाशिम रोडवरील बाबासाहेब नाईक वृध्दाश्रमातील वृध्दांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर येथील शासकीय रुग्णालयात माणुसकीची भिंत यांचे सहकार्याने रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना तथा गोरग रब अबाल वृध्दांना फळाचे किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरुवातीला हिंदुदयसम्राट शिवसेना प्रमुख व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रतिमेचे पुजन माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजु अण्णा वाकडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी रंगराव काळे जिल्हा समन्वयक, मोहन विश्वकर्मा सहसंपर्क प्रमुख यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जीवनावर त्यांनी केलेल्या कार्याची माहिती व त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविण्याच े आवाहन करुन अभिवादन केले. याप्रसंगी मालतीताई मिश्रा महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख, विजय बाबर माजी विधानसभा संघटक, अब्बासभाई अल्पसंख्यांक आघाडी तालुका प्रमुख, हरिष गुरुवाणी शहर संघटक, रवि बहादुरे शहर उपप्रमुख, जयवंतराव जाधव काळी दौ तथा संघटक, संतोष भेंडे उपतालुका प्रमुख, गजानन निकस, तुषार व्यवहारे, अवि बहादुरे, विजय पानपट्टे, कृष्णा काळे, संजय पोटे, विक्की वाढवे, मनोज देवकुळे, बाबुराव राठोड, सुधाकर ठमके उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राजु वंजारे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी शिवसैनिक तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसैनिकांकडुन माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव व त्यांचे सहकारी प्रमोद ठाकुर, अनंता चतुर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच ही संस्था समाजउपयोगी व दिनदुबळ्या गोरगरिब नागरिकांसाठी स्वयंस्फुर्तीने कार्य करीत असल्याने त्यांचा गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close