प्रा.डॉ.अनुश्री पुरी (बन) यांच्या “ग्रामीण बंजारा समाज आणि बदलती संस्कृती” या ग्रंथाचे अमरावती येथे प्रकाशन.

, पुसद: येथील प्रा.डॉ.अनुश्री पुरी (बन) यांच्या “ग्रामीण बंजारा समाज आणि बदलती संस्कृती” या ग्रंथाचे अमरावती येथे दि.१७ जानेवारी २०२६ रोजी डॉ भाऊसाहेब उपाख्य देशमुख सभागृह श्री शिवाजी वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे समाजशास्त्र संशोधन संस्था महाराष्ट्र द्वारा वर्तमान समाजव्येस्थेतील बदलते संदर्भ या विषयावरील आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लाभलेल्या मा.डॉ.मोना चिमोटे अधिष्ठाता,मानव विज्ञान विद्याशाखा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या हस्ते “ग्रामीण बंजारा समाज आणि बदलती संस्कृती” या ग्रंथाचे प्रकाशन झाले.तसेच या अधिवेशनाला व पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लाभलेले उदघाटक म्हणून लाभलेले मा. डॉ.अंबादास कुलट प्राचार्य.श्री.शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती तसेच प्रमुख वक्ते मा.डॉ.आशिष सातव वैद्यकीय अभ्यासक, धारणी जिल्हा अमरावती व या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा.डॉ.बी.एम.कऱ्हाडे, अध्यक्ष, समाजशास्त्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य, मा.डॉ.बी. एच.किर्दक उपाध्यक्ष, समाज शास्त्रीय संशोधन संस्था तथा अध्यक्ष, समाजशास्त्र अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, मा.डॉ.किशोर राऊत अध्यक्ष, समाजशास्त्रीय संशोधन संस्था महाराष्ट्र, मा.डॉ.जी.एन.निम्बार्ते, सचिव समाजशास्त्रीय संशोधन संस्था महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत हा ग्रंथ प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पार पडला असून प्रा.डॉ.अनुश्री पुरी(बन) प्र .समाजशास्त्र विभाग प्रमुख श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद येथे कार्यरत असून डॉ बन यांनी संशोधक , समाजशास्त्र अभ्यासक व लेखिका म्हणून हा ग्रंथासाठी साध्या व सोप्या मराठी भाषेचा वापर केला आहे.”ग्रामीण बंजारा समाज व त्यांची आजची बदलती संस्कृती या संशोधनात्मक ग्रंथात पश्चिम विदर्भातील बंजारा जमाती संदर्भात सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे.बंजारा जमात गावा बाहेर जंगलात, दऱ्या- खोऱ्यात वास्तव करणारी असून त्यांच्या परंपरागत जीवन पद्धती ,राहणीमान, खाणे पिणे, प्रथा, परंपरा, चालीरीता, संकेत, विश्वास, श्रद्धा व देवी देवता, सण, समारंभ अश्या एकूणच जीवनशैलीत ग्रामीण व नागरीकरणाच्या प्रक्रियेतून झालेले बदल या ग्रंथात सविस्तर अभ्यास करून मांडण्यात आले आहे.त्याच प्रमाणे दऱ्या खोऱ्यात वास्तव करणाऱ्या आणि सततची भटकंती करणाऱ्या बंजारा जमातीची वास्तविक माहितीचे संशोधनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, आणि वाशीम अश्या एकूण पाच जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील वास्तव्य करणाऱ्या बंजारा जमातीचा नमुना घेऊन त्यांच्या कडून तथ्य संकलित केल्या नंतर विश्लेषण करण्यात आले आहे.बंजारा जमातीत होणारा बद्दल हा मुळातच नागरी संस्कृतीच्या परिणामा बरोबर नवीन आर्थिक धोरण, खुली स्पर्धा आणि जोडीला खाजगीकरण, उदारीकरण व तसेच जागतिकीकरण या धोरणामुळे जगातील सर्वच देशांमध्ये होत असलेला बद्दल महत्वाच्या ठरत आहे.डॉ . बन यांचे या पूर्वीही विविध विषयावरील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद, चर्चासत्रे व कार्यशाळा मधून एकूण सतरा शोध निबंधाचे वाचन व जनरल मधून प्रकाशित झाले आहे.त्याचप्रमाणे ” ग्रामीण बंजारा समाज आणि बदलती संस्कृती” हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी अनेक समाज शास्त्र अभ्यासकाच्या संदर्भ ग्रंथाचा वापर करण्यात आला असून आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने या ग्रंथाचे लिखाण केले आहे.व अभ्यासक, संशोधक विद्यार्थी व तसेच भावी पिढीना हा ग्रंथ नक्कीच उपयोगी ठरणार आहे असा विश्वास प्रा.डॉ.अनुश्री पुरी (बन) यांनी व्यक्त केला आहे. या ग्रंथासाठी लाभलेले मार्गर्शक मा.डॉ.किशोर राऊत अध्यक्ष समाजशास्त्रीय संशोधन संस्था महाराष्ट्र याचे मार्गदर्शन लाभले आहे व हा संशोधत्मक पहिला ग्रंथ त्यांच्या आईवडील यांना समर्पित करण्यात केला आहे. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला विविध उपस्थित मान्यवराचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असून डॉ बन यांनी ग्रंथ लिखाण केल्याबद्दल त्यांचे कौतुक,अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



