ईतर

डंपिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगीच्या धुरामुळे रहिवाशांचा श्वास कोंडला जातो तरीही प्रशासनाची दुर्लक्ष! जनतेचा रोष पेटतो…

स्थानिक नागरिकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार! 

पुसद :येथील इंदिरा नगर डंपिंग ग्राउंडमधून दररोज विषारी काळा धूर बाहेर पडतो, ज्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. दाट, हानिकारक धुरामुळे असह्य वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे आणि अपघातही होत आहेत. येथील डंपिंग ग्राउंडमधून दररोज विषारी काळा धूर बाहेर पडतो, ज्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. दाट, हानिकारक धुरामुळे असह्य वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे आणि अपघातही झाले आहेत. या डंपिंग ग्राउंडमध्ये नगरपालिकेच्या सर्व १५ वॉर्डांमधून कचरा येतं असुन या कचऱ्याच्या मोठा मोठ्या ढीगानां जाणीवपूर्वक आग लावली जाते त्यामुळे आता हा परीसर स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक स्थळ बनला आहे.हा कचरा जाणूनबुजून जाळला जातो, त्यातून जाड, विषारी धूर निघतो ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, डोळ्यांना जळजळ होते आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होतात. हा रस्ता हा माहुर गडाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी कमी दृश्यमानतेमुळे या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक करणे कठीण जाते, तर वृद्ध रहिवाशांच्या आरोग्याची स्थिती बिघडत असल्याचे सांगितले जाते.तर स्थानिकाच्या वतीने वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.

 

 

 

 “स्वच्छ भारत” मोहिमेखाली घोटाळ्याचा आरोप..

 

स्थानिक नागरिकांच्या जोरदार आरोपानुसार, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कचरा व्यवस्थापन, वेगळीकरण आणि बायोमायनिंग प्रक्रियेसाठी सरकारने दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी हा फक्त कागदोपत्री निधी  हाडपण्यासाठी वापरला जात आहे. प्रत्यक्षात इंदिरानगर येथे कुठल्याही प्रकारची वैज्ञानिक प्रक्रिया होत नसून, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक अधिकारी हे कचरा जाळण्याचा सुलभपणे अवैध मार्ग अवलंबत असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार करीत आहेत ‘स्वच्छ भारत मिशनच्या’ अधिकृत पोर्टलवर या ठिकाणी सर्व कामे योग्यरित्या पार पडत असल्याची फसवी माहिती नोंदवली जाते आहे.

या धुराच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर नाहक घातक परिणाम…

“गेल्या तीन दिवसांपासून परिसरातील नागरिक हा धूर श्वासेतून घेत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सतत चालू असलेल्या  आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणे किंवा स्वच्छ श्वास घेणेही अशक्य झाले आहे. तेथील मुलांमध्ये श्वासाच्या तक्रारी वाढल्या आहेत. या जळणाऱ्या कचऱ्यातून निघणाऱ्या विषारी  जाड, धूरामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, डोळ्यांना जळजळ होते आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होतात अनेक वृद्ध नागरिक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.हा महामार्ग  माहुर गडाला जात असल्याने या रस्त्यावर  ये-जा करणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी कमी दृश्यमानतेमुळे या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक करणे कठीण  झाल्याने या मार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.परिसरातील विहिरीतील पाण्याचाही रंग बदलला आहे. आम्हाला वाचवा,” अशी हाक स्नाथानिक नागरिकांने दिली आहे.

 

नागरिकांच्या मुख्य मागण्या!

 

 इंदिरानगर डंपिंग ग्राऊंडवर कचरा यार्डवरील कचरा जाळणे तत्काळ आणि पूर्णपणे थांबविण्याचा आदेश तात्काळ द्या..

या कचऱ्याच्या भ्रष्टाचाराची  उच्चस्तरीय व न्यायिक किंवा विशेष तपास समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी…

संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबिन करावे..

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा आणि पाण्याची गुणवत्ता तपाससुन तात्काळ  परिणाम जाहीर करावेत…

प्रोसेसिंग आणि बायोमायनिंग प्रकल्पासाठी दिलेल्या निधीच्या गैरव्यवहाराची सखोल  चौकशी करावी..

 

नागरिकांनी हे स्पष्ट केले आहे की, जर या आरोपांची त्वरित आणि निष्पक्ष तपासणी झाली नाही आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर त्यांना न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यास भाग पडेल. त्यांनी हीच तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देशक, स्वच्छ भारत मिशनचे निर्देशक, अमरावती विभागीय आयुक्त व यवतमाळ जिल्हाधिकारी यांनाही पाठवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close