Uncategorized

हजरत उमर फारूक विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

पुसद: हजरत उमर फारूक विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहम्मद वकील तसेच पुसद शहरातील सर्व पत्रकार आणि विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहम्मद वकील यांनी मार्गदर्शन करताना पत्रकार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजातील घडामोडी निष्पक्षपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर उपस्थित पत्रकारांनी पत्रकारितेतील सत्यता, जबाबदारी आणि नैतिक मूल्ये यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारांचा उपहार देऊन सत्कार करण्यात आला.कार्यकर्माचे सूत्रसंचालन  नवेद अहमद सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री मोहम्मद जुनैद सर, नदीम खान सर, इरफान शेख सर, अब्दुल करीम सर, सकलेन सर, निसार सर, यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close