तालुकास्तरीय स्पर्धेत वालतूर तांबडे जिल्हा परिषद शाळा ठरली चॅम्पियन!

पुसद : पंचायत समितीच्या खेळ, क्रीडा व कला संवर्धन मंडळाच्या विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 29 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 सेंट मेरी इंग्लिश शाळा पुसद येथे आयोजित करण्यात आले होते. पुसद तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वालतुर तांबडे या शाळेने वयोगट 6 ते 11 व 11 ते 14 या वयोगटात चॅम्पियनशिप मिळवली. सलग अकरा वर्ष तालुकास्तरीय चॅम्पियनशिप मिळवून वालतुर तांबडे या शाळेने इतिहास घडवला.वयोगट 6 ते 11 खो खो खेळात मुले व मुली दोन्ही गटात विजेते ठरले. 4×100 रिले या धावण्याच्या स्पर्धेत मुले व मुली विजेते ठरले. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कुमारी परिदी गव्हाळे प्रथम, 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत यशवंत कन्हेरे, बाली चव्हाण प्रथम, बुद्धिबळ या खेळात अनिकेत तांबारे व संध्या चव्हाण द्वितीय. कॅरम दिव्या हुरडूके प्रथम, लांब उडी परिदी गव्हाळे प्रथम आले. वयोगट 11 ते 14 खो खो या खेळात मुले व मुली विजेते ठरले. 4×100 रेले प्रकारात मुले व मुली विजेते ठरले. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भावेश राठोड प्रथम तसेच चाहत जाधव प्रथम. 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नैतिक जाधव प्रथम तसेच आराध्या गव्हाळे प्रथम. लांब उडी भावेश राठोड प्रथम. योगासने शिवानी अनिल जाधव प्रथम. कॅरम शिवानी जाधव द्वितीय. थाळी व गोळा फेक मध्ये आर्यन राठोड प्रथम आले.शालेय स्पर्धेमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी यापूर्वी राज्यस्तरावर नेतृत्व केले होते. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मधुकर मोरझडे, शिक्षक भारत राठोड,विकास वाकडे, प्रफुल्ल पांडे,जयसिंग चव्हाण, रोहिदास राठोड,श्रीराम आढाव, संभाजी हंगरगे,विक्रम राठोड यांनी अभिनंदन केले. तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी संजयजी राठोड , गटशिक्षणाधिकारी धीरज आडे, विस्तार अधिकारी उमेश वाघमारे, अमित बोजेवार, विश्रांती फोपसे, शितलकुमार वानखडे,सुनील गवळी,प्रकाश टेकाळे,चोंढी केंद्राचे केंद्र समन्वयक प्रल्हाद जाधव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष तांबारे, आलासिंग राठोड, बीबीषण राठोड, सदानंद राठोड, दिलीप जाधव, परमानंद राठोड, प्रकाश चिरंगे, राहुल जाधव,बलदेव राठोड, उदल जाधव,रविराज राठोड,गजानन हमाने, चंदल पवार,उल्हास राठोड, केवल भिसे व समस्त ग्रामस्थांनी अभिनंदन करून जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



