क्राइम

आक्षेपार्ह पोस्ट पोलिसांच्या रडारवर; व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनसह सदस्यांना पोलिसांचा इशारा!

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर पुसद पोलिसांची करडी नजर..

पुसद : पोलीस उपविभागातील ठाण्यातंर्गत कायदा व सुविधा अबाधित राखण्यासाठी सर्व नागरीकांनी सहकार्य करावे. व्हॉट्स ॲपसह सोशल मीडियावर आ- क्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर पोलिस प्रशासन कारवाई करणार असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधिकारी हर्षवर्धन बि.जे. यांनी दिला आहे.

याबाबत ‘झेप न्यूजला’ पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुसद पोलिस उपविभागातील ठाण्यातंर्गत सोशल मीडियाचा वापरताना दक्षता बाळण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियातून पसरविण्यात येणाऱ्या  आक्षेपार्ह पोस्टची खात्री करून घ्यावी. पोलिसांची अशा पोष्टवर कायम करडी नजर असून, सर्व परिस्थिती हाताळण्यास पाेलिस सक्षम आहेत. सायबर क्राईम सेल सोशल मीडियातील विविध साइटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोशल मीडिया पेट्रोलिंगमुळे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरविण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची यूझर्सनी सर्वप्रथम खात्री करण्याची गरज आहे. जुन्या वादग्रस्त घटनांचा काहीजण फायदा घेण्याच्या प्रयत्नात होऊ शकतो आणि ते सोशल मीडियातून निराधार, खोट्या अफवा पसरवत जाऊ शकतात पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याची खरी गरज आहे. त्यांच्याकडून प्रक्षोभक, समाजमन दुखावलं जाईल, अशा पाेस्ट व्हायरल हाेणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सोशल मीडियाचा वापर प्रत्येकांनी जबाबदारीने पोस्ट करावी. तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट व्हायरल करू नका. कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, प्रत्युत्तर देताना शब्द जपून वापरावेत.सध्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून समाजात तेढ निर्माण करणारे, जातीय धार्मिक भावना दुखावणारे, अश्लिल बदनामीकारक तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट, व्हिडीओ व संदेश प्रसारीत केल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत.आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर तयार करणे, प्रसारीत करणे, फॉरवर्ड करणे, किंवा त्याला प्रोत्साहन देणे हा गंभीर गुन्हा असुन संबंधिताविरूध्द भारतीय न्याय संहिता (बिएनएस) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत विविध कलमान्वये कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. नागरीकांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह, अपप्रचार करणारा किंवा कायद्याला धरून नसलेला मजकूर सोशल मिडीयावर पोस्ट अथवा शेअर करू नये. तसेच अशा प्रकारचा मजकूर आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाणे किंवा सायबर सेल यांच्याकडे माहिती द्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असुन दोषीविरूध्द कोणतीही तडजोड न करता कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणी गुन्ह्यांच्या प्रकरणात आतापर्यंत दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश जण १९ ते ३० वयोगटांतील तरुण आहेत. काही कारणामुळे हे तरुण अशा चुकीच्या पोस्ट व्हायरल करत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांच्या कृतीचा नंतर पश्चाताप होतो. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. यासाठी पालकांनीही मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच जे कोणी व्यक्ती सोशल मिडीयाचा गैरवापर करत असतीलतर सुजाण नागरीकांनी पोलीसांना माहिती द्यावी. असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधिकारी हर्षवर्धन बि.जे. यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close