राजकिय

माजी नगरसेवक साकीब शाह या युवा कार्यकर्त्यांला महाविकास आघाडीतील स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने दुर्लक्ष केल्याने नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला मोठी किंमत मोजावी लागल्याची चर्चा!

पुसद : नगरपरिषद निवडणुकीचा धुराळा शांत झाला असला तरीही राजकीय संघर्ष आता तिव्र होतांना दिसत आहे तर काही स्थानिक पक्षातील नेते पुन्हा जुन्या मित्रपक्षासोबत गुप्त भेटीगाठी घेऊन सत्ता स्थापनेचे गणीते जुळवाजुळव करत आहेत काही पक्षातील नेत्यांमध्ये जुने राग, मतभेद उफाळून येऊ लागल्याने एकमेकांची जिरवाजिरवीचे राजकारण सुरू केले आहे.काही नेत्यांनी तर पूर्वीचा वचपा काढण्याची एकही संधी सोडणार नसल्याची भिष्म प्रतिज्ञा घेतल्याचे दिसून येत आहे.निवडणुक संपली तरीही सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे बार निघू लागले आहेत. प्रत्येक प्रभागात प्रचाराचा धुरळा शांत असताना सुद्धा राजकीय संघर्ष तीव्र होतांना दिसत आहे. निवडणुकीचा निकाल हा केवळ एका उमेदवाराच्या पराभवापुरता मर्यादित न राहता, शहराच्या राजकारणात खोलवर आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा ठरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. मोहम्मद नदीम यांचा पराभव हा मतगणिताचा अपघात नसून, संघटनात्मक विस्कळीतपणा, समन्वयाचा अभाव आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वाकडे झालेल्या दुर्लक्षाचा थेट परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उघडपणे सुरू झाली आहे. या संपूर्ण समीकरणाच्या केंद्रस्थानी एका नावाची चर्चा शहरात चौका चौकात रंगु लागली असून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.त्यामध्ये युवा कार्यकर्ते व नेहेमी सत्तेतील लोकांच्या कारभारावर विद्रोहाच्या भुमीकेत असलेले माजी नगरसेवक साकिब शाह या युवा कार्यकर्त्यांला या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सहकारी घटक मित्रपक्षातील काँग्रेस नेत्यांनी डावल्यामुळे पक्षाला फटका बसला आहे.निवडणूक जिंकण्यासाठी केवळ पक्षाची ओळख पुरेशी ठरत नाही, तर जमीनीवर काम करणारे, जनतेशी थेट नाते असलेले आणि संघर्षातून उभे राहिलेले कार्यकर्ते निर्णायक पोषक वातावरण निर्माण करतात तसाच काँग्रेस पक्षातील हा युवा कार्यकर्ता पक्षासाठी संजीवनी होता हे साकिब शाह हे असेच एक नेतृत्व होते. मात्र महाविकास आघाडीच्या रणनीतीत काँग्रेस पक्षाने त्यांना अपेक्षित स्थान न दिल्याने काँग्रेस पक्षाने स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता माजी नगरसेवक साकिब शाह हे युवा नेतृत्व राजकीय पदासाठी किंवा स्वार्थासाठी पक्षात काम करत नव्हते त्यांनी त्यांच्या सक्रिय काळ २०१२ मध्ये युथ काँग्रेस विधानसभा अध्यक्ष, २०१६ मध्ये यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी सचिव आणि त्याच वर्षी पुसद नगरपालिकेचे नगरसेवक अशी त्यांची भूमिका केवळ संघटनात्मक नव्हती, तर ती संघर्षशील होती. जमियत उलमा-ए-हिंदचे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुसद विकास मंचचे सचिव म्हणून त्यांनी सामाजिक आणि नागरी प्रश्नांना राजकीय व्यासपीठावर आणले.नगरसेवक म्हणून त्यांनी शहरातील मूलभूत समस्यांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेऊन सर्वसामान्याचे प्रश्न जसे घरकुल लाभार्थ्यांसाठी थकीत रक्कम मिळावी म्हणून केलेले उपोषण आणि त्यातून राज्य शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेला मिळणे, हा त्यांच्या संघर्षाचा ठोस परिणाम मानला जातो. दिव्यांगांचा रखडलेला निधी आंदोलनातून वितरित करून देणे, स्वच्छता आणि पाणीपुरवठा प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारणे, रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात ‘भीक मांगो आंदोलन’ करून सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणे—ही त्यांची कार्यपद्धती होती.कोरोना काळातही साकिब शाह यांची भूमिका अधिक ठळकपणे समोर आली. ५०० गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील बंद पडलेले दहा व्हेंटिलेटर पुन्हा कार्यान्वित करून घेण्यासाठी केलेले आंदोलन हे केवळ राजकीय नव्हे, तर मानवी दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरले. याच काळात रुग्णालयात एम.डी. मेडिसिन डॉक्टरची नियुक्ती व्हावी यासाठी आंदोलन करून आरोग्य यंत्रणेला फाईलवर तसेच नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठविला. मुरुम घोटाळा, वृक्ष घोटाळा, टेंडर प्रक्रियेतील अनियमितता, वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे वाढलेला भ्रष्टाचार—या साऱ्या मुद्द्यांवर त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन हे वास्तव भ्रष्टाचार जनतेसमोर मांडून अनेक आंदोलने करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. जन्म-मृत्यू नोंदणी संगणकीकरणासारख्या प्रशासनिक सुधारणा सुद्धा त्यांच्या दबावामुळे प्रत्यक्षात आल्या.इतकेच नव्हे तर पुसद जिल्हा घोषित व्हावा या मागणीसाठी सात दिवसांचे आमरण उपोषण, पुसद दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आंदोलन, बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आंदोलन अशा कृतींमुळे

साकिब शाह हे पुसद शहरातील स्थानिक काँग्रेस पक्षातील ‘जमीनीवरचा युवा नेता’ कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून त्यांना शहरात ओळखले जाऊ लागले. विविध समाजघटकांमध्ये—गरीब, कामगार, अल्पसंख्याक, युवक—त्यांचा प्रभाव निर्माण झाला होता.अशा पार्श्वभूमी असलेल्या युवा कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला स्थानिक काँग्रेस पक्षाने या निवडणूकीच्या रणनिती आखताना सुद्धा विश्वासात न घेतले नाही किंवा त्यांच्याशी संदेशही साधला नाही त्यामुळे या कार्यकर्त्याला या निवडणुकी प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्यामुळे त्यांच्या हितचिंतकांना हे वाईट वाटले त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला, संघटनात्मक ताकद एकत्र येऊ शकली नसल्यामुळे मतांचे रूपांतर सत्तेत करण्याची संधी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील काँग्रेस पक्षाच्या हातातून गेली. नाहीतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते डॉ. मोहम्मद नदीम यांचा अल्पशा मताने झालेला पराभव हा झाला नसता. आणि पक्षाची ही पीछेहाट झाली नसती. आणि आज रोजी काँग्रेसचा नगराध्यक्ष या निवडणुकीत विजय झाला असता. आणि स्थानिक काँग्रेस पक्ष एका युवा कार्यकर्त्याला मुकला नसता अशी चर्चा पुसद शहरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने सन्मानजनक जमीनीवरील कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची तयारी दाखविली असती, तर आज निकाल वेगळा लागण्याची दाट शक्यता होती.पुसदच्या निकालाने एक स्पष्ट राजकीय संदेश दिला आहे—निवडणुका केवळ पोस्टर, घोषणा आणि गणितावर जिंकता येत नाहीत; त्या जिंकल्या जातात विश्वासावर, संघर्षावर आणि जमीनीवर उभ्या राहिलेल्या नेतृत्वावर. या वास्तवाकडे दुर्लक्ष केल्याची किंमत महाविकास आघाडीलातील काँग्रेस पक्षाला मोजावी लागली असल्याची सूत्राची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close