माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये ५३ वा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन!

पुसद : येथील माउंट लिट्रा झी स्कूलमध्ये ५३ वा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य विज्ञान संस्था नागपूर, शिक्षण विभाग पंचायत समिती पुसद, तालुका विज्ञान व गणित मंडळ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे व भारताचे माजी राष्ट्रपती , मिसाईल मॅन ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कौशल्यांचा विकास व्हावा. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळावी तसेच भविष्यात उत्कृष्ट वैज्ञानिक बनावे हा होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रमजी गट्टाणी (संस्थापक अध्यक्ष माऊंट लिट्रा झी स्कूल पुसद), हे होते. प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव संदिपजी जिल्हेवार, सहसचिव प्रितीताई गट्टाणी, यांची होती.
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक हर्षवर्धनजी बी.जे. (उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद), धिरज आडे (गटशिक्षणाधिकारी पुसद), अमर राठोड (अधीक्षक शा .पो.आ. पंचायत समिती पुसद), अमित बोजेवार (विस्तार अधिकारी पं.स. पुसद), कु विश्रांती फोपसे ( विस्तार अधिकारी ), बळीराम राठोड (विस्तार अधिकारी), शितलकुमार वानखेडे ( गट समन्वयक), जयवंत मोटे( अध्यक्ष गणित अध्यापक मंडळ पुसद), मुरलीधर राठोड (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ), सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक डॉ .पंकज चौधरी, डॉ. गौरव काळे, डॉ .स्वामी ताथोड, डॉ. एस. आर. भोयर, सचित चव्हाण, सुनिल गवळी हे होते. सदर कार्यक्रमास २१० पेक्षा अधिक शाळेतील विद्यार्थ्यांचा , शिक्षकांचा व विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यकांचा सहभाग होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अकॅडमिक डायरेक्टर शबनम शेख मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा समन्वयक, प्रशासन अधिकारी नेहा सोळंकी मॅडम, सर्व क्रिडा प्रशिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत ठेंगे (अध्यक्ष विज्ञान मंडळ पुसद) यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सुनील सोमकुवर या शिक्षकांनी मानले.



