पुसद नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, २१ डिसेंबरला निर्णय!मुस्लिम बहुलप्रभागात मतदानाचा टक्का वाढला..सत्ताधारी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..

पुसद : नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक२०२५ ही सत्ताधाऱ्यांत प्रतिष्ठेच्या झालेल्या नगरध्यक्षपदाच्या व नगरसेवकदांसाठी मंगळवारी (दि. २) मतदान पार पडलं दरम्यान, एका ठिकाणी सत्ताधारी घटक पक्षातील राष्ट्रवादी अप पक्षाचे उमेदवार व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्यात मतदान केंद्रावरचं शाब्दिक वास झाला परंतु सकाळपासून शहरातील काही बुथवर कार्यकर्ते आणि प्रतिस्पर्धी गट आमने-सामने आले होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा स्थानिकांनी वेळेवर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर काही ठिकाणी ईव्हीएममध्ये झालेले तांत्रिक बिघाड, शिवाय मतदारांच्या यादीतील गोंधळ हे वगळता बाकी सर्वत्र सुरळीत मतदान सुरु होते.या घटना वगळता इतर मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले.मतदानाच्या दिवशी सायंकाळी ९:०० वाजेपर्यंत शहरातील एकूण ६३ हजार २३२पैकी ३९हजार१७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये३१हजार६९१ पुरुष मतदार पैकी २० हजार ३४५पुरुष मतदारांनी तर ३१हजार५३६ महिला मतदारा पैकी १८ हजार ८२५महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान टक्केवारी ६१.९५ इतकी नोंदवली गेली.पुरुषांमध्ये ६४.२० टक्के तर महिलांमध्ये ५९.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. पुरुषांचे मतदान महिलांपेक्षा ३ टक्क्यांनी जास्त राहिले.मतदान पुर्ण झाल्याने उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. मतदान झाल्यानंतर रात्रीच मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले.मात्र मतदान यंत्रे आणखी १८ दिवस सुरक्षित बंदोबस्तात ठेवावे लागणार आहेत. आज होणारी मतमोजणी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान या सर्व घडामोडींवर आणि निवडणूक आयोगासह मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तर मतमोजणी लांबणीवर पडल्याने सर्व उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे.नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत१५ प्रभागातील बुथ निहाय मतदान असे झाल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेली अधिकृत माहिती आहे.



असुन मतदानाची एकुण ६१.९५टक्केवारी एवढी झाली आहे.



