निशाणीचा गोंधळ, उमेदवारीचा विश्वासघात ?नाईक कुटुंबाचे प्रेम हे पुतनामावशीचे; राजू दुधेचा प्रस्थापित सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल!

पुसदः सत्तासुंदरीचा मोह आणि चटक भल्याभल्यांना गुडघे टेकायला लावून कल्पनातीत तडजोडी करायला भाग पाडते. त्याला शहरातील प्रस्थापित घराण्याचा राजकीय पक्ष आणि त्याचे शीर्षस्थ नेते असलेले ज्येष्ठ नेते अपवाद नाहीत. उलट सत्तेच्या राजकारणात ते तुलनेने अधिकच स्खलनशील आणि अगतिक आहेत. प्रस्थापित घराण्याच्या ज्येष्ठ नेत्यांना फुटलेला पान्हा हे पुतनामावशीचे प्रेम आहे. त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत.प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवारी आणि पक्षनिशाणीवरून निर्माण झालेल्या गोंधळाबाबत राजू नथ्थुजी दुधे यांनी पत्रकार परिषदेत घनाघात आरोप केला आहे.
सध्या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवारी आणि पक्षनिशाणीवरून निर्माण झालेल्या गोंधळाबाबत राजू नथ्थुजी दुधे यांनी शनिवारी निवेदन काढत राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेल्या विश्वासघात केल्याचाआरोप सत्ताधारी प्रस्थापित घराण्यावर केला आहे. दुधे यांनी सांगितले की, मी आणि माझी पत्नी सौ. जयश्री दुधे यांनी प्रभाग क्र. १ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी देण्याचे नाईक कुटुंबाच्या वतीने आश्वासन दिले. त्यानुसार आम्ही पक्षाकडूनही नामांकनपत्र भरले. मात्र ऐनवेळी पक्षाने मला आणि माझ्या पत्नीला फक्त नगरसेवक पदासाठी अधिकृत ‘एबी फॉर्म’ दिला; नगराध्यक्ष पदाचा फॉर्म मात्र घरी देऊन दिशाभूल केली, असा आरोप त्यांनी केला. यामुळे पक्षाचा नगरसेवकांसाठीचा फॉर्म स्वीकारावा लागला असला तरी तो प्रभागातील मतदारांचा विश्वासघात ठरू नये म्हणूनच तांत्रिक कारणांमुळे मी प्रभाग क्रं. १ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी कायम ठेवला आहे, तर याच दरम्यान, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांनी अपक्ष म्हणून कायम ठेवत प्रस्थापितांवर निशाणीचा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. आम्हाला दिलेला एबी फॉर्म हे त्यांचे पुतणामावशीचे प्रेम आहे. सुज्ञ मतदारांनी अपप्रचाराला बळी न पडता माझ्या नगरध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार शिट्टी चिन्हास मतदान करावे, असे आवाहन राजु दुधे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. राजू नथुजी दुधे हे नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष शिट्टी चिन्हावर रिंगणात असून प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर (तांत्रिक कारणास्तव) नगरसेवकपदासाठी त्यांची उमेदवारी कायम आहे.निशाणीचा गोंधळ, उमेदवारीचा विश्वासघात ?नाईक कुटुंबाचे प्रेम हे पुतनामावशीचे राजू दुधेचा प्रस्थापित सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे.



