पुसद शहरात नप निवडणुकीत प्रचाराचे नारळ फुटले,आता आवाज महाविकास आघाडीचा.? निष्पक्ष व भ्रष्टाचारमुक्त सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा- खासदार संजय देशमुख

पुसद : शहरात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे.थंडीचा कडाका वाढत चालला आहे.त्याचबरोबर निवडणुकीच धुरळाही उडू लागलाआहे. विविध राजकीय पक्षांचे अधिकृतउमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आधी शहरातील देवदेवतांचे दर्शन घेत प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर मतदारांच्या दर्शनासाठी उमेदवार आपल्या समर्थकांसह मार्गस्थ होताना दिसत आहेत.दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने बालाजी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला आहे.
यावेळी खासदार संजय देशमुख बोलताना म्हणाले की,पुसद शहरात प्रस्थापित घराण्याची सलग सत्ता राहिली आहे.ज्या पद्धतीने पुसद शहराच्या विकासात अडथळा निर्माण करून सत्तेत बसलेल्यांनी या शहराची वाट लावली आहे. ज्या पध्दतीने कारभार झाला ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. जाती- जातीत भेद निर्माण करुन विरोधकांचा निवडणूक जिंकण्याचा विचार दिसतो. आपण समजदार आहात. महाविकास आघाडी सर्व जाती-धर्मातील घटकांना सोबत घेवून निवडणूक लढवित आहे. मागील ३० वर्षाचा अनुभव असलेले एक सक्षम उमेदवार म्हणुन आम्ही डॉ. मोहम्मद नदीम यांना अध्यक्षपदासाठी उभे केले आहे. शरद मैंद व डॉ. अकिल मेमन यांना घेवून महाविकास आघाडीत चांगले उमेदवार देण्यात आले आहेत. पुसदमध्ये विकासाची गंगा पोहचविण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीला मत देवून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन खा. संजय देशमुख यांनी केले.
याप्रसंगी खा. संजय देशमुख बोलत होते. ते विरोधकांवर चौफेर टिका करतांना म्हणाले, येथील आमदार व मंत्री यांनी आपल्या धर्मपत्नीला उभे करुन घरातच सत्ता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एक कार्यकर्ता त्यांच्याकडे निर्माण झाला नाही असे म्हणत त्यांनी भाजपावर टिका केली. हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपाने जैन मंदिराच्या ट्रस्टची जागा मंत्री मोहोळ यांनी बळकावली आहे. त्यांना मंदिराच्या जागा पुरत नाहीत. अशांना सत्ते पासून दूर ठेवा. एक निष्पक्ष व भ्रष्टाचारमुक्त सत्ता देण्याचा आमचा मानस आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता एकसंघ असलेली महाविकास आघाडी निश्चितपणे जिंकेल. पुसदची जनता हुशार आहे. २ तारखेला पंजा- मशाल-तुतारीलाच मतदान करतील असा विश्वास खा. संजय देशमुख यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील अध्यक्षीय उमेदवार डॉ. मोहम्मद नदीम यांचा परिचय झाला. त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रभाग क्र. १ चे शिवानी वर्षाताई दिलीप वाकडे (उबाठा), सैय्यद सलमान सैय्यद लुकमान (काँग्रेस), प्रभाग क्र. २: दळवे पौर्णिमा माधव (उबाठा), प्रभाग क्र. ३: मोहम्मद राजीक मोहम्मद तैय्यब (राका शरद पवार), खान हिना कौसर शहेबाज (राकाँ शरद पवार), प्रभाग क्र. ४: अब्दुल वहाब अब्दुल लतीफ (राका शरद पवार), चालीकवार विजया सुधाकर (उबाठा), प्रभाग क्र. ५: विश्वकर्मा मोहन दुर्गाप्रसाद (उबाठा) व गुरुवानी सिध्दी हरीश (उबाठा), प्रभाग क्र. ६: आगाशे दिव्या लक्ष्मण (उबाठा) व गौरी अब्दुल रहेमान फिरोज (राकाँ शरद पवार), प्रभाग क्र. ७: नेमायते योगि प्रकाश (काँग्रेस) व शेख जब्बार शेख युसुफ प्रभाग क्र. ८: शेख सुलतान शेख अब्दुल (काँग्रेस) व खान उमरीन गाजी उस्मान (काँग्रेस), प्रभाग क्र. ९: शमीना खानम फिरोज खान (काँग्रेस) व डॉ. मोहम्मद नदीम (काँग्रेस), प्रभाग क्र. ११: विघ्ने पद्माकर नागोराव (काँग्रेस) व रत्नप्रभा अनिल शिंदे (काँग्रेस), प्रभाग क्रं.१२: वाढवे विक्की धोंडबा (उबाठा) व उज्वला विजय बाबर (उबाठा), प्रभाग क्र. १३: चापके विद्या उत्तम (राकाँ शरद पवार) व डॉ. अकिल मेमन (राकाँ शरद पवार), प्रभाग क्र. १४: कांबळे अशंका संतोष (राकाँ शरद पवार) व ॲड. भारत जाधव (राका शरद पवार), प्रभाग क्र. १५ः चव्हाण अनिता भारत (राक शरद पवार), हरीमकर अर्चना दीपक (राकाँ शरद पवार) व गादेवार उध्दव वसंत (राकाँ शरद पवार) यांनी परिचय करुन दिला. महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. राकाँ शरद पवार गटाचे सरचिटणीस शरद मैंद, आघाडीचे अध्यक्षीय उमेदवार डॉ. मोहम्मद नदीम, राकाँ शहराध्यक्ष डॉ. अकिल मेमन, नाना बेले, काँग्रेसचे अनिल शिंदे, शहराध्यक्ष शेख जिया, महेश खडसे, शिवाजी देशमुख सवनेकर, सैय्यद इस्तियाक, ॲड. गजानन देशमुख, पंडीतराव देशमुख, जकी अन्वर, राकाँ शरद पवार गटाचे ॲड. भारत जाधव, भवरसिंह सिसोदिया, उत्तम चापके, उदय गंधेवार तर शिवसेना उबाठाचे रंगराव काळे, मोहन विश्वकर्मा, राजुअण्णा वाकडे, विजय बाबर, लक्ष्मणराव आगाशे, वैभव सुने, वर्षाताई वाकडे, मालती मिश्रा, अब्बासभाई, तुषार व्यवहारे, ॲड. विरेंद्र राजे, राजु वंजारे व महाविकास आघाडीतील गणमान्य उपस्थित होते.



