पुसद नप निवडणुकीत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला!राज्मंयत्र्यांनी पत्नीलाच निवडणूक रिंगणात उतरविल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये नाराजी!
राज्मंयत्र्यांनी पत्नीलाच निवडणूक रिंगणात उतरविल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये नाराजी!

पुसद : सध्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहे. येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. प्रस्थापित सत्ताधारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पक्षांकडून स्वतःच्या धर्मपत्नीला उमेदवारी देऊन काल प्रभाग क्रं. ५ मधील महाकाली मंदिरात राज्यमंत्री इंद्रनील नाईक व सौ. मोहिनी नाईक यांच्या हस्ते प्रचाराचे नारळही फोडून प्रचारास सुरुवात केली आहे.
तरीही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे चित्र पाहावयास मिळत आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीने खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात आज बालाजी मंदिरात प्रचाराचे नारळ फोडुन उमेदवाराचा प्रचार सुरू केलाआहे.
‘अभी नहीं तो कभी नहीं’ यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नदीम उमेदवार नशीब आजमावत आहेत. कदाचित यानंतर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला संधी मिळणार नाही, या भावनेतून मातब्बर या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. नदीम यांना निवडणूक रिंगणात उतरविले असून महाविकास आघाडीने या निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले आहे. यामुळे महाविकास आघाडीची थेट लढत प्रस्थापित घराण्यातील उमेदवार व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या धर्मपत्नी सौ.मोहीनी नाईक तसेच भाजपाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांच्यासोबत रंगणार आहे त्यामुळे डॉ. नदीमसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशी परिस्थिती असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
महायुतीतील वाटाघाटी फिसकटल्याने घटक पक्ष एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले आहे.महायुतीचा भाग असलेल्या प्रस्थापित सत्ताधारी घराण्यातील राज्यमंत्र्यांनी आपल्याच सहकारी पक्षाला डावलून घरातच उमेदवारी घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांसह भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तीव्र नाराजी आहे. तर या घराणेशाहीनी वर्षानुवर्ष सत्ता भोगली तसेच या घराण्याच्या मंत्र्याकडे अर्धा डझन खाते असुनही सत्तेची लालसा निर्माण झाल्याने आता या शहराचा सातबाराच आपल्या नावावर करावा की काय? असा प्रश्न नागरिक सोशल मीडियावरून विचारू लागले आहे. एकीकडे राज्यमंत्र्याच्या धर्मपत्नीला पुसदची लेक म्हणून या निवडणुकीत प्रमोट केले जात असून लेकीला मतदान करावे असे मतदारांना आव्हान करण्यात येत आहे. परंतु त्यांना हे माहीत नाही की काय.? “सून कधीच लेक होऊ शकत नाही” हे विधान सामाजिक आणि पारंपरिक विचारसरणीला धरून नाही जिथे सून ही वेगळ्या कुटुंबातून आलेली व्यक्ती मानली जाते. तिच्याकडून अपेक्षा आणि नियमांचे पालन करण्याची अपेक्षा नसते त्यामुळे, सून आणि लेक यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या वेगळ्या समजल्या जातात. मनुष्य धर्मात सुन जर लेक झाली असती तर सासू-सासर्यात थोरल्या- धाकट्या भावा-भावात कधीच भांडणे झाली नसती किंवा नातेसंबंध तुटले नसते आणि अनेक कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले नसते. त्यामुळे मतदारांनो सावधान मतदान करताना विचार करा.. सत्तेची लालचा असलेल्या प्रस्थापित कुटुंबात वर्षंनुवर्षे या एकहाती सत्ता असूनही या शहराचा विकास झाला नाही उलट विकासात्मक कामे गुंतागुंतीचे झाले आहे. नवीन कामेही राजकारणाचे बळी ठरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील विकास कामांमध्ये टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. शरीरातील गल्लोगल्लीतील रस्त्याची वाट लागली असून शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहे. मोऱ्याचे पाणी नागरिकाच्या घरात घुसत आहे. तरीही मतदाराकडून मताची अपेक्षा केल्या जात आहे. प्रस्थापित कुटुंबातच एक्की राहिली नसल्याने या कुटुंबातील नेत्यांनीच वेगवेगळ्या पक्षाकडे मोर्चे वळविली आहे. जो प्रस्थापित घराणेशाही आपले कुटुंब एकत्र ठेवू शकत नाही तो जनतेचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी होईल का.? हे मात्र संशोधनाचा विषय आहे.याचा मात्र शहरातील मतदारांनी जाती-धर्माच्या पलीकडे जावुन ‘डोळे उघडे ठेवून निट बघुन विचार करावा. या शहराचा जलद गतीने विकास व्हावा आणि विकासाला बाधा ठरत असलेल्यांना या प्रस्थापित घराणेशाहीला एकदा ‘खो’ द्यावा व विकासमुख नेतृत्वाला मतदान करावे यासाठी महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षाने पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी( अप) भाजप अशी होण्याची शक्यता निर्माण झाली असून ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.



