
पुसद :नगरपरिषदेची सार्वत्रिक २०२५ ची निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी निकाल घोषित होणार आहे. नगरपरिषदेसाठी महविकास आघाडी तसेच भाजपा, शिवसेना (शिंदे गट), व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) हे राजकीय पक्ष आणि काही राजकीय पक्षांतील अपक्ष बंडखोर उमेदवार आमने-सामने येणार आहेत. एकूण १५ प्रभागांत ३१नगरसेवक पदासाठी १८२अर्ज वैद्य ठरले आसले तरीही सहाजिकच पुसद नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होण्याचे संकेत अपेक्षीत असले, तरी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतरच या लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी कोणत्या पक्षांमधून कोणता उमेदवार सर्वाधिक मताधिक्य घेऊन नगराध्यक्षपदाचा विजयी मुकुट परिधान करतो याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण १४ अर्ज वैध ठरले असले तरी त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निखिल चीद्दरवार, शिवसेना (शिंदे गटाचे) ॲड.अनिल ठाकुर, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाच्या सौ.मोहीनी इंद्रनील नाईक, महविकास आघाडीचे उमेदवार डॉ.मोहम्मद नदीम आणि अपक्ष बंडखोर उमेदवार राजु दुधे हे ५ उमेदवारांमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी मुख्यलढत होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यामुळे भाजपच्या व राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या रणनीतिकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निखिल चीद्दरवार, रिंगणात.. महायुतीला तडा गेल्यानंतर निखिल चिद्दवार यांना पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिले आहे. त्यांनीही मागील काळात नगरपरिषदेच्या २०१६ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून नगरसेवक झाले भाजपाचे गटनेते म्हणून पद भूषवले आहे. त्यांनाही शहरात मानणारा मोठा वर्ग आहे. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर भाऊ मनगुटीवार यांच्याकडून पुसद शहरात व प्रभाग क्रं. ५ मध्ये विविध कामात वेगळ्या पद्धतीने निधी खेचून आणून त्यांनी कामे करून घेतली परंतु भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे तर काहींनी बंडखोरी केली आहे. परंतु संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.शिवसेना शिंदे गटाचे वेळेवर आलेले उमेदवार ॲड.अनिल ठाकूर रिंगणात.. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ॲड.अनिल ठाकूर यांनी अखेरच्या दिवशी शिंदे गटात प्रवेश घेऊन अर्ज दाखल केला असला तरी शिंदे शिवसेने बंडखोरी केल्यानंतर पुसद शहरातही शिवसेनेचे गट निर्माण झाले त्यामुळे शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकदही किती हे मात्र संशोधनाचा विषय आहे. तर ॲड.अनिल ठाकूर हे माजी नगरसेवक असून त्यांनी पुसद विकास मंचाची स्थापना करून नगराध्यक्ष पदासाठी स्वघोषित उमेदवारी जाहीर केली होती परंतु ऐनवेळी शिंदे शिवसेनेत प्रवेश करून तिकीट मिळवले त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या पक्षातील कार्यकर्त्याची कितपत साथ लाभते, हे पाहणे महत्वाचे आहे. महाविकास आघाडीचे व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते डॉ. मोहम्मद नदीम रिंगणात.. महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहे.डॉ नदीम यांनी यापूर्वी पुसद नगरपरिषदेचे अनेकवेळा नगरसेवक व उपाध्यक्ष पद भूषविले आहे. ते राजकारणात व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असून त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. तसेच त्यांचा शहरातील विविध भागात प्रत्येक समाज जाती धर्माच्या नागरिका दांडगा जनसंपर्क आहे यांची स्वतःची व्होटबँक असून महाविकास आघाडीतील सहकारी पक्षातील नेते कार्यकर्ते पदाधिकारी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे सध्या शहरात महाविकास आघाडीची स्थिती फार मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या या उमेदवारास नगरपरिषद कारभार चालवण्याचा मोठा अनुभव आहे.थेट नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून बंडखोर उमेदवार राजू दुधे रिंगणात..उतरले आहेत. एकंदरीत त्यांनाही नगरपरिषदेत अनेक वर्षे पाणीपुरवठा सभापती पद उपभोगले असुन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे ते कट्टर समर्थक होते परंतु राज्यमंत्र्यांनी कुटुंबात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिल्याने यांनी बंडखोरी केलीआहे. राजू भाऊ दुधे यांचाही मित्र परिवार मोठा असून शहरात संपर्क दांडगा आहे.राष्ट्रवादी (अप) पक्षाच्या व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सुविधपत्नी सौ.मोहिनी नाईक या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात..सौ.मोहिनी नाईक ह्या राजकारणात नवख्या उमेदवार असल्या तरीही वर्षानुवर्षे त्यांच्याच कुटुंबाची एक हाती सत्ता नगरपरिषद वर आहे तर पतीदेव राज्यमंत्री असल्याने व कुटुंबाची सत्ता असल्याने आणि मतदारावर पकड असल्यामुळे त्यांनाही हा विजय सुखकर होईल अशी अपेक्षा आहे. मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची निवडणुक असतात, त्यांना संधी मिळता प्रत्यक्षात नेत्यांनी आपल्याच घरी उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यामध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये तसेच मतदारांमध्येही नाराजी आहे.त्यामुळे नगरपरिषदेत थेट नगराध्यक्षसाठी पंचरंगी लढत अपेक्षित असली तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजपा – शिवसेना शिंदे आणि महाविकास आघाडी यांचे तगडे उमेदवार पाहता त्यांच्यातच खरी चुरस पाहण्यास मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.हे राजकीय पक्ष आमने-सामने येणार असले तरीही सहाजिकच नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत अपेक्षीत सध्या असली, तरीही निवडणूक साम-दाम-दंड या कृतीतून अधिक प्रतिष्ठेची केली जाणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.



