शैक्षणिक

वालतूर तांबडे शाळेत राज्यस्तरीय निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न!

पुसद: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच विभागीय मैदानी स्पर्धा यवतमाळ येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वालतुर तांबडे येथील खेळाडूंनी नेत्र दीपक यश संपादन केले. १४ वर्षे वयोगटात कु.आराध्या शालिक गव्हाळे हिने उंच उडीत उत्कृष्ट कामगिरी केली. भावेश ज्ञानेश्वर राठोड ८० मीटर हर्डल्स मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच.आर्यन भारत राठोड थाळीफेक मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरले. जिल्हा परिषदेच्या शाळेमधून राज्यस्तरावर निवड झालेली वालतुर तांबडे ही जिल्हा परिषदेची एकमेव शाळा ठरली त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.शाळा व गावकऱ्यांच्या वतीने विभाग स्तरावर निवड झालेल्या ४०विद्यार्थ्यांचा व राज्यस्तरासाठी निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांचा परिवारासह सत्कार घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष तांबारे, प्रमुख अतिथी दिलीप जाधव, प्रमानंद राठोड, उपसरपंच सौ निकिता सदानंद राठोड, आलासिंग राठोड, दयाराम इंगोले, बिबीशन राठोड, सुभाष चिरंगे, ग्रामसेवक साखरे साहेब, दत्ता राठोड, सुभाष राठोड पोलीस पाटील, चंदुसिंग राठोड तंटामुक्ती अध्यक्ष,सदानंद राठोड, उल्हास राठोड, गोविंद जाधव, गणपत जाधव, उदल जाधव, संतोष इंगोले, केवल भिसे, दत्ता दुमारे, बलदेव राठोड, राहुल जाधव, रवी राठोड, गजानन हमाने, देविदास शिंदे, अनंता वाघमारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक मधुकर मोरझडे, आभार जयसिंग चव्हाण यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत राठोड, प्रफुल पांडे, विकास वाकडे, रोहिदास पवार यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी समस्त गावकऱ्यानी उपस्थिती दर्शवली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close