क्राइम

पुसद शहरात अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरवर आरोग्य विभागाची मोठी कारवाई!

पुसद : शहरात अवैधरित्या गर्भलिंग निदान करणारे काही डॉक्टर टोळी सक्रिय असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्याच चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.हि कारवाई आरोग्य विभागाने दि.३ ऑक्टोंबर २०२४रोजी रात्री १०: ३० वाजण्याच्या सुमारास नाईक चौकातील कोसलगे कॉम्प्लेक्स मधील एका अवैध गर्भलिंग निदान सुरू असलेल्या गाळ्यावर छापा टाकला आहे पुसद उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षका डॉ. मिनल भेंलोडे-पवार यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी पुसद शहर पोलीस स्टेशनच्या पथकांनी केलेल्या कारवाईत सोनोग्राफीच्या  यंत्रासह एका अवैधरीत्या सोनोग्राफी चालविणाऱ्या डॉक्टरावर अवैधरित्या गर्भलिंग निदान केल्यावरून गर्भधारणा पूर्व आणि प्रसवपूर्व रोग निदान तंत्र प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दीड तासापुर्वि छापा टाकून सुद्धा याप्रकरणी कारवाई उशिरा केल्याने सदर अवैधरित्या बोगस गर्भनिदान करणाऱ्या अशा डॉक्टरला अभय कोणाचं याच्या मात्र पंचक्रोशीत चर्चा सुरू झाल्या असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पुसद शहरात अवैधरित्या गर्भलिंग चाचणी करणाऱा डॉक्टर हा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कहाकर येथील रहिवाशी असुन या बोगस डॉक्टरने कोसलगे कॉम्प्लेक्स मध्ये एक दुकान गाळा  भाडेतत्त्वावर घेऊन घेऊन अवैधरित्या सोनोग्राफी सेंटर चालवीत असल्यामुळे अनिल रामदास सोनुने वय ३९ वर्षे याचेवर विविध कलमान्वये शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.

  • शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून प्राप्त माहिती आशिकी, पुसद शहरातील स्व.वसंतराव नाईक चौकालगत असलेल्या कोसलगे कॉम्प्लेक्स मधील एका दुकान गाळ्यात अवैधरित्या सोनोग्राफी सेंटर सुरू असल्याने यास सोनोग्राफी सेंटरमध्ये अवैधरित्या गर्भलिंग चाचणी केले जात असल्याची खात्रीलायक माहिती आरोग्य विभागाला मिळाताच संबंधित आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी होऊ लागल्याने काही वर्षांपूर्वी गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी आणली, तसा कायदाही झाला. कायद्यात गर्भलिंग करणाऱ्या डॉक्‍टरांसह ही चाचणी करून घेणाऱ्या दाम्पत्यांवरही कारवाईची तरतूद केली. प्रत्येक रुग्णालयात या कायद्याचे गांभीर्य सांगणारे फलकही झळकले  पण प्रत्यक्षात ही चाचणी बंद आहे का.? असा प्रश्‍न विचारला, तर अर्थात त्याचे उत्तर हे नाही असे आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे अजूनही समाजातील वास्तव आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या काही प्रवृत्ती यामुळे गर्भलिंग निदान चाचण्या खुलेआम सुरू आहेत. यापूर्वी सुद्धा पुसद शहरात अवैधरित्या गर्भलिंग तपासणी सुरू असल्याची चर्चा सुरू होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.त्या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधून छापा टाकत असल्याचे कळविले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासन आरोग्य सेवाचे अधिकारी त्यांचे शासकीय वाहन क्रमांक एमएच ३१,एफआर ७१०५ ने पुसद येथे येऊन त्या सोनोग्राफी सेंटरवर सापळा रचला व धार टाकली या धाडीमध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळून आली होती. सोबतच या नंबरची सोनोग्राफी मशीन देखील अधिकृत नव्हती. त्याशिवाय त्या डॉक्टरांकडे सोनोग्राफी मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे शैक्षणिक पात्रता देखील नव्हती. तरीदेखील तो डॉक्टर सोनोग्राफी सेंटर चालवीत होता.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करीत परवाना नसलेल्या या बोगस डॉक्टरांवर कारवाई केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कॉम्प्लेक्स मधील दुकान गाळ्याचा रवाजा तोडून केला आत प्रवेश ..

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले कोसलगे  कॉम्प्लेक्स मध्ये अवैधरित्या गर्भलिंग चाचणी केल्या जात असल्याची जोरदार चर्चा  शहरात सुरू असताना या अगोदर देखील ढाणकी येथील एका अल्पवयीन मुलीचे गर्भपात पुसद शहरात केल्याची बाब उघडकीस आली होती. व त्या मुलीला जीव गमाववा लागला होता तरीही पुसद शहरातील डॉक्टरांवर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही पोलिसांनी फक्त तपास केला असल्याचे सांगून या शहरातील हे प्रकरण जवळपास बंद झाल्यासारखेच आहे तर दुसरीकडे अवैधरित्या गर्भ निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरवर सापळा रचून धाड टाकण्यासाठी आरोग्य विभागाने एका गर्भवती महिलेला त्या सोनोग्राफी सेंटरमध्ये पाठविले होते. त्याचवेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सिविल ड्रेस मध्ये दुकानात,दुकानाच्या बाजूला व दुकानाबाहेर त्या बोगस डॉक्टरला संशय येऊ नये यासाठी सामान्य व्यक्ती प्रमाणे वावरत होते. त्यानंतर दुकानावर धाड टाकून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. अशावेळी एका खोलीचा दरवाजा लावून असल्याने तो वाजवून उघण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता.परंतु दरवाजा कोणीही उघडत नसल्याने दरवाजाला लाथ मारून दरवाजा उघडला होता. त्यानंतर अंधार असलेल्या खोलीमध्ये बोगस डॉक्टर सोबत एजंट म्हणून आलेल्या एका गर्भवती महिलेला सोनोग्राफी करताना रंगेहात पकडले असल्याची सूत्राची माहिती असून जवळपास दीड तासाच्या नंतर संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे मात्र विशेष आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close