ईतर

मोठी बातमी! ‘प्रशासकराज’मध्ये पुसद नगर परिषद कार्यालयाला टक्केवारीचे ग्रहण!नपचे मुख्याधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी!

शहरातील विकास कामांमध्ये १५ते२० टक्के टक्केवारी घेत असल्याचा भाजपच्या शहराध्यक्ष दीपक परिहार यांचा खळबळ जनक आरोप

पुसद :नगरपरिषद मध्ये प्रशासकराज सुरू आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक मुख्यधिकारी अभियंते हे संबधित कंत्राटदारासोबत संगनमत करून विविध विकास कामांमध्ये१५ते२०टक्के टक्केवारी घेऊन मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे कामे करीत असल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दीपक परीहार यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.पुसद नगरपरिषद मध्ये म्हणजे सुमारे दोन वर्षापूर्वी रुजू झालेले प्रशासक डॉ. अभिजीत वायकोस यांनी नगरपरिषद कार्यालयचा कारभार सांभाळला तेव्हापासून मुख्यधिकारी अभियंते हे संबधित कंत्राटदारासोबत संगनमत करून विविध विकास कामांमध्ये१५ते२०टक्के टक्केवारी घेऊन मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे विकास कामे करून भ्रष्टाचार केला असल्याचा असल्याच गंभीर आरोप भाजपाचे शहर अध्यक्ष दिपकसिंह परिहार यांनी केला असून मुख्य अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. आगामी काळात न.प.चे वातावरण तापणार असे दिसत आहे. भाजप शहराध्यक्ष दीपक सिंह परिहार यांनी प्रधान सचिव नगर विकास विभाग २ मुंबई यांना मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या विरुद्ध १३ मुद्यावर तक्रार दिली. त्यानुसार मुख्याधिकारी कमीशनची रक्कम मिळाल्याशिवाय कामाकडे लक्ष देत नाहीत, शहरातील लेआऊट, अवैध बांधकाम, आरक्षण फेरबदल, घनकचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार, पाणीपुरवठा विभागात कोट्यावधी रुपयाच्या उलाढालमध्ये कमिशन, विद्युत व आरोग्य विभागात साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार, जन्ममृत्यु विभागात मुळ रेकॉर्ड नसल्याचा देखावा करून गरजूची लूट होत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड व नाहक त्रास, टेकडी बगीच्यासह अन्य आरक्षित जागी सुशोभीकरणाच्या नावाखाली अनावश्यक उधळपट्टी, मोकाट कुत्र्यांचे कागदोपत्री लसीकरण करून लाखो रुपयाचे बनावट देयके काढणे, कंत्राटी पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन ऐवजी अर्जप्रमाणे केरकचरा उचलण्याची व्यवस्था केली जाते परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. न. प. मधील संवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले. वास्तविक कंत्राटी कर्मचाऱ्याकडुन आर्थीक उलाढाल न करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तसेच मर्जीतील कनिष्ठ लिपीकांकडून कोणत्याही विभागाची कामे केली जाऊन इप्सीत साधल्या जाते, शहरातील न.प. केलेल्या विकास कामांमध्ये रस्त्यांची कामे टक्केवारी घेऊन अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामे झाल्याने झाल्याने त्यांची तांत्रिक विभागाकडून चौकशी करावी, त्यांच्या काळात दिलेल्या देयकांचे विशेष लेखापरीक्षण करावे तसेच त्यांच्या एकूण मालमत्तेची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

नाईकांनाच्या विरोधात नेहमी वातावरण निर्माण करणारे मात्र यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान केल्याने त्यामुळे राज्यमंत्री ॲड.इंद्रनिल नाईक या तक्रारीवर काय.? भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे..

विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इमाने इतबारे ॲड.इंद्रनिल नाईकांच्या समर्थनासाठी मोठी मेहनत घेऊन भरघोस मतदानाने निवडून आणले व ते आजच्या घडीला राज्यमंत्री बनले. त्याच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दीपक परिहार यांनी मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी राज्यमंत्री ॲड. इंद्रनिल नाईक यांचेकडे सुद्धा तक्रार दिल्याने संकट काळातील मित्र पक्षाच्या तक्रारवर त्यांची भूमिका काय राहील याकडे मतदार संघातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

भाजपचे शहराध्यक्ष दीपक परीहार यांनी केलेल्या या गंभीर आरोपावर मुख्याधिकारी डॉ.अभिजित वायकोस यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही. वरील तक्रारीची आपल्याला प्रत मिळाली नाही. मात्र तक्रारचे स्वरूप बघितल्यानंतर पुढील भाष्य करता येईल अशी जवळ प्रतिक्रिया झेप न्यूज ला दिली आहे. त्यामुळे   नगरपरिषदेच्या विकास कामांमध्ये कोणतेही चुकीचे काम केले नाही : डॉ.अभिजीत वायकोस मुख्याधिकाज्ञरी न.प.पुसद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close