विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

पुसद:विद्यार्थ्यांचे कौशल्य व क्रीडात्मतेचा उत्सव हा एक संस्मरणीय अनुभव ठरला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्तपालन, नेतृत्वगुण, नम्रता, कर्तव्यदक्षता, आत्मनिर्भरता, समर्पण, या विविध गुणांचे जोपासना व्हावी याकरिता विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल मध्ये दिनांक 16 ते 23 डिसेंबर यादरम्यान विविध मैदानी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वैयक्तिक व सामूहिक स्पर्धांचे विविध सामने घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भव्य संचालनाने झाली. संचालन विद्यार्थ्यांचा जोम, शिस्त आणि समर्पणाचे प्रतीक होते. क्रीडामशाल प्रज्वलन आणि रंगबिरंगी फुग्यांच्या सोडतीने क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. पॉम् पॉम् ड्रिल, कराटे प्रात्यक्षिक (स्वसंरक्षण कौशल्य दाखवणाऱ्या धाडसी मुली), डंबेल ड्रिल, रिंग ड्रिल आणि लेझीम ड्रिल या सर्वांनी लक्ष वेधून घेतले. विजेत्यांना व सहभागींना मेडल्स व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता शाळेच्या संचालक मंडळापैकी सौ. शुभदा मैंद, श्री मनीष अनंतवार, श्री संगमनाथ सोमावार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा भट देशमुख, उप- मुख्याध्यापिका प्रतिमा जाधव, पूर्व प्राथमिक विभागाच्या हेडमिस्ट्रेस विजया त्रिपाठी, प्रशासकीय अधिकारी गोविंद निमडगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी शरयू चाटरमल, आराध्या चव्हाण यांनी शाळेतील शिक्षिका अर्चना मोहेकर, व दिव्यानी राठोड यांच्या समवेत यशस्वीरित्या केले. क्रीडा शिक्षक सुधाकर खराटे, सुनील यादव, संदीप तासके, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी अथक परिश्रम घेतले.



