मतदारांनो सावधान.!पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पडणार ; प्रस्थापित नाईक घराण्याच्या वर्चस्वाला मोठा धोका निर्माण झाल्याचे चित्र!

पुसद: विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आले आहे.या निवडणुकीत महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद मैद, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य, मनसेचे अधिकृत उमेदवार अश्विन जैस्वाल, यांच्यामध्ये चुरस निर्माण झाल्याने महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार इंद्रनील नाईक यांच्या घड्याळाचे काटे बंद पडणार असल्याने प्रस्थापित नाईक घराण्याच्या वर्चस्वाला मोठा धोका निर्माण झाल्याने या नाईक कुटुंबासाठी सर्वात मोठा झटका बसणार असल्याचे चित्र मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.पुसद हा विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या मतदारसंघ. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या वसंतरावजी नाईक साहेब यांचा हा मतदारसंघ, त्यांच्यानंतर नाईक कुटुंबातले दुसरे मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांनाही याच मतदारसंघाने निवडून दिलं. थोडक्यात आजवर नाईक कुटुंबाबाहेरची एकही व्यक्ती पुसदकरांनी निवडून दिलेली नाही.नाईक परिवाराचा बालेकिल्ला म्हणून पुसद मतदारसंघ ओळखला जातो.पुसद मतदारसंघातील जनतेने आणि नाईक परिवाराने एकमेकांवर नेहमी विश्वास ठेवला आणि सतत पुढे वाटचाल केली. पुढे नाईक परिवारातील कुठल्याही पिढीच्या सदस्याला मागे वळून पाहण्याची वेळ या मतदारसंघात आली नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जनतेने भक्कम साथ दिल्याने नाईक परिवाराचे मतदारसंघात कायम वर्चस्व राहिलं मनोहरराव नाईक यांना आदर देणारा त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणारा, मान देणारा, जीव लावणारा मोठा वर्ग आजपर्यंत होता परंतु इंद्रनील नाईक यांनी मागील कार्यकाळात मतदारसंघात पाहिजे तसे लक्ष न दिल्याने चार चमचे मित्र सोबत ठेवल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व त्यांची वाताहत सुरू झाली.तर एकीकडे इंद्रनील नाईक यांनी सख्या मोठ्या भावाला ययाती नाईक यांना वेळोवेळी जाणीवपूर्वक डावलल्याने घरात वाद निर्माण झाला होता अखेर निवडणुकीच्या तोंडावर हा वाद तात्पुरता क्षमला असला तरीही भविष्यात हा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण मतदारसंघात त्यांनी विकासाच्या नावावर कोट्यावधीचा विकासनिधी आणल्याचा गवगवा केला परंतु विकास मात्र या मतदारसंघात दिसलाच नाही उलट त्यांनी निवडणूक काळात घोषणापत्र प्रसिद्ध करून या मतदार संघासाठी मोठमोठे स्वप्न दाखवली परंतु ते भविष्यात सत्यात उतरेल याची कोणतीही गॅरंटी नाही. या मतदारसंघातील मतदार हा पुर्वी सारखा राहिला नाही सुज्ञ मतदार झाला असून जातीपतीच्या पलीकडे जाऊन मतदान करणार आहे. वर्षानुवर्षी या मतदाराच्या पिढ्या विश्व दारिद्र्यात झगडत आहेत.कारण वर्षांनुवर्षे या प्रस्थापित घराण्याने सत्ता उपभोगली पण माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब व सुधाकररावजी नाईक साहेब यांनी या मतदारसंघातील जनतेसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेल्या सुख सुविधा साखर कारखाने, सूतगिरण्या, जिनिंग प्रेसिंग, दिवसाढवळ्या कवडीमोल भावाने विक्री केली व यांच्या कार्यकाळात देशोधडीला लागले. एकीकडे माळ पठार आजही उशाला धरण असताना पाण्यासाठी तडफडतो आहे तर या आमदारांनी मागील काळा सत्ता उपोगली तो आमदार आता पुढील काळात काय.?विकास करणार असा साधा प्रश्न मतदारसंघातील जनतेला पडला आहे. याचा मतदारांनी थोडा विचार करावा “जो बूंद से गई, वो हौद से नहीं आती” त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक असून या निवडणुकीत जनतेसमोर पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे ही निवडणूक इंद्रनील नाईक यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असून या निवडणुकीत महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद मैद, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य, मनसेचे अधिकृत उमेदवार अश्विन जैस्वाल, यांच्यामध्ये चुरस निर्माण झाल्याने महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार इंद्रनील नाईक यांच्या घड्याळाचे काटे बंद पडणार असल्याने नाईक घराण्याच्या वर्चस्वाला मोठा धोका निर्माण झाल्याने या प्रस्थापित कुटुंबासाठी सर्वात मोठा झटका बसणार असल्याचे चित्र मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.



