शैक्षणिक

पुसद तालुक्यातील कवडीपूर येथे शिक्षकदिनी स्वयंशासनदिन साजरा!

पूसद  : तालुक्यातील भोजला केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गुरुवारी(ता.५) येथे शिक्षकदिनी “स्वयंशासन दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र तालंगकर हे होते , प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर शिक्षिका करुणा काळे, रंजना कोटगीरवार, मनिषा काण्णव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेतील विद्यार्थी चंचल राठोड, लवली चव्हाण, जीविका पवार, अक्षरा राठोड,यश राठोड, तन्मय जाधव, लक्ष्मी राठोड, नयन राठोड, नंदिनी राठोड, प्रतीक्षा जाधव, नेहा राठोड, मीनाक्षी जाधव, अमोली राठोड, मयूर जाधव, अर्जुन राठोड, देवेंद्र राठोड, ज्ञान दीपक राठोड, प्रांजली चव्हाण, देवेंद्र राठोड,वीर राठोड, अनन्या जाधव, नयन राठोड,चांदणी आडे, प्रियंका राठोड,सलोनी राठोड आदींनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन मुख्याध्यापक, शिक्षक व शिपाई यांची भूमिका पार पाडून स्वयंशासनदिन उत्साहात साजरा केला.

यावेळी शिक्षक बनून मुलांना शिकविणे सोपे नसल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमदिनी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट कार्य करणार्‍या विद्यार्थी शिक्षकांना यावेळी भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव कानगुले व आभार प्रदर्शन सीमा येरावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय पवार,सर्व सदस्य व पालकांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close