राजकिय

पुसद येथे १३ ऑगस्ट रोजी माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन होणार!

पुसदः विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकां करीता तालुक्याच्या ठिकाणी सर्वांना एक व्यासपीठ हवे होते व त्याकरीता एकाच ठिकाणी सर्व प्रश्नांची मांडणी करण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यालय व्हावे अशी सर्वांची ईच्छा होती. त्याप्रमाणे ॲड. आशिष देशमुख प्रदेश अध्यक्ष राकाँ शरदचंद्र पवार पक्ष (लिगल सेल) यांच्या पुढाकारातून येत्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी१०.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळ तालुका कार्यालय करण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुर्यकांताताई पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. खा. शरदचंद्र पवार, प्रदेश अध्यक्ष जयंवतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशावरुन हे कार्यालय होत आहे. याप्रसंगी सौ. वर्षाताई निकम जिल्हाध्यक्ष, गुलाबराव गावंडे माजी मंत्री, बाबासाहेब गाडे पाटील प्रदेश उपाध्यक्ष, अफजल फारुकी प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक, अशोकराव घारफळकर माजी अध्यक्ष जि. प. यवतमाळ, साहेबराव ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष, ॲड. नारायणराव आठवले जिल्हा उपाध्यक्ष, संजय पाटील कान्हेकर जिल्हा उपाध्यक्ष, सौ. नलिनीताई चौधरी महिला जिल्हाध्यक्ष, भास्कर पंडागळे जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल, नानाभाऊ जळगांवकर जिल्हा सरचिटणीस, दीपक जाधव जिल्हा सरचिटणीस यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या तालुका कार्यालयाच्या उ‌द्घाटन प्रसंगी मतदार संघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. आशिष देशमुख, माधवराव वैद्य, साकीब शाहा, ॲड. सविता आढाव, सैय्यद नवाज अली व तेजस मुकेश यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close