श्री थावरा नाईक माध्यमिक शाळा जामनाईक-१ विद्यार्थ्याची१०वी बोर्डाच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम ; मुलींनी मारली बाजी

पुसद:तालुक्यातील श्री थावरा नाईक माध्यमिक शाळा जामनाईक-१ शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षीचा १०वी चा निकाल ९५.२३ टक्के लागला आहे. एकूण ४३ विध्यार्थी परीक्षेला बसले होते. ४० विध्यार्थी उत्तीर्ण झाले. ३३ विध्यार्थी विशेष प्रविण्या सह उत्तीर्ण झाले आणि ७ प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाले आहे. ४३ पैकी ४० विध्यार्थी उत्तीर्ण झाले. ३ विध्यार्थी परीक्षेला नबसल्यामुळे ते अनुउत्तीर्ण झाले आहे.श्री थावरा नाईक माध्यमिक शाळा जामनाईक येथील
विध्यार्थिनी कु. वैष्णवी जामूदे ही ८७.४०% घेऊन शाळेतून प्रथम आली आहे.द्वितीय मोहन गुळवे ८७.२०% व कु. काजल गडदे ८७.२०%,तृतीय कु.पायल मिरटकर ८७% चतुर्थ कु मीरा लांडगे ८६.८०%पाचवी कु इंगोले प्रणाली ८६.४० सहावी कु. सपना ठोके ८६% घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थ्यांना शाळेचे संचालक मांगीलालदादा चव्हाण व शाळेचे अध्यक्ष पंकजभाऊ चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंकाताई चव्हाण तसेच शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जयसिंग राठोडसर, लिंगाडे सर, जयप्रकाश राठोड सर, देवा पवार सर, अनिल चव्हाण, विनायक अनखुळे, आकाश राठोड, सचिन बोके व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



